लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 12:07 IST2025-08-09T12:05:17+5:302025-08-09T12:07:13+5:30
ज्या भाच्यासोबत ती पळून गेली तो तिच्यापेक्षा १० वर्षांनी लहान आहे. या प्रकाराबाबत पीडित पतीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्यानंतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी
बिहारच्या मुजफ्फरनगर येथे मामी-भाच्याचे अजब लफडे समोर आले आहे. पतीला सोडून भाच्यासोबत प्रेम प्रकरणाच्या अनेक बातम्या अलीकडच्या काळात ऐकायला येतात. त्यात प्रियकरासाठी पतीवर जीवघेणा हल्ला करणे, हत्या करणे हे प्रकारही सर्रास सुरू आहेत. आता भाच्यासोबत मामी पळून गेली, सोबतच १३ वर्षाच्या मुलालाही घेऊन गेल्याची घटना घडली आहे. याबाबत पतीने पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यावर पोलिसांनी फरार मामी-भाच्याचा शोध सुरू केला आहे.
परिसरातील नवल किशोर आणि खुशबू देवी यांचं आयुष्य आनंदाने सुरू होते. त्यात या दोघांमध्ये भाचा नीरजची एन्ट्री झाली. घरी येत जात असल्याने मामी भाच्याच्या प्रेमात पडली. पती बाहेर गेल्यानंतर मामी कायम भाच्याला घरी बोलवत होती. भाच्याच्या प्रेमात मामी इतकी बुडाली की पतीने मारहाण करूनही ती त्याच्यासोबत पळून गेली. २० वर्षापूर्वी खुशबूचं नवल किशोरसोबत लग्न झाले होते. ज्या भाच्यासोबत ती पळून गेली तो तिच्यापेक्षा १० वर्षांनी लहान आहे. या प्रकाराबाबत पीडित पतीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्यानंतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पत्नीला परत आणा अशी विनवणी पतीने पोलिसांकडे केली आहे. माझा भाचा कायम घरी येत जात होता. त्यात त्याला माझ्या पत्नीवर प्रेम झाले. जेव्हा मला हा प्रकार कळला तेव्हा मी त्याला विरोध केला मात्र तो माझ्याशी वाद घालत होता. या दोघांना मी मारले, माझा मुलगाही आईच्या या प्रकारावर विरोध करत होता. या दोघांना समजावूनही ऐकले नाही. त्यानंतर आता माझ्या १३ वर्षाच्या मुलाला सोबत घेऊन पत्नी भाच्यासोबत पळाली आहे अशी तक्रार पीडित पतीने पोलिसांकडे केली.
त्याशिवाय पत्नी खुशबूने प्रियकरासोबत मिळून घरातील ५० हजार रोकड, लाखोंचे दागिने, जमिनीची कागदपत्रे घेऊन फरार झाला आहे. मला ही गोष्ट माहिती पडली, मी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला परंतु दोघांनी मिळून मला मारहाण केली. माझा हात तोडला आणि त्यानंतर पळून गेले. खुशबूने जाता जाता मला धमकी दिली. जर मी बाहेर कुणाला काही सांगितले तर ती आत्महत्या करेल असा दावा पतीने केला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. लवकरच फरार असलेल्या खुशबू आणि नीरजचा शोध घेऊ असं पोलिसांनी सांगितले आहे.