भिवंडीत प्रेम संबंध तोडल्याच्या रागातून महिलेला रॉकेल टाकून पेटविले

By नितीन पंडित | Updated: November 1, 2023 19:35 IST2023-11-01T19:35:42+5:302023-11-01T19:35:42+5:30

याप्रकरणी दोन जणांवर नारपोली पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

In Bhiwandi, a woman was set on fire by pouring kerosene out of anger at the break-up of a love affair | भिवंडीत प्रेम संबंध तोडल्याच्या रागातून महिलेला रॉकेल टाकून पेटविले

भिवंडीत प्रेम संबंध तोडल्याच्या रागातून महिलेला रॉकेल टाकून पेटविले

भिवंडी:  प्रेम संबंध तोडल्याच्या रागातून २५ वर्षीय महिलेवर रॉकेल टाकून जाळल्याची धक्कादायक घटना भिवंडीत अंजुररोड मानकोली येथे घडली आहे. सुदैवाने या रॉकेल हल्ल्यात महिला वाचली असून सध्या गंभीर जखमी अवस्थेत तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी दोन जणांवर नारपोली पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून नारपोली पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या दोघांनाही भिवंडी न्यायालयात हजर केले असता ४ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी ठेवण्यात आली आहे

सुनीजर वर्मा व रमेश वर्मा असे गुन्हा दाखल झालेल्या दोघा आरोपींची नावे आहेत.यातील सुनीजर वर्मा याचे २५ वर्षीय महिलेशी पूर्वीपासून प्रेम संबंध होते. मात्र मागील एक महिन्यांपासून महिलेने सुनीजर याच्यासोबत असलेले प्रेम संबंध तोडल्याने या रागातून सुनीजर वर्मा व त्याचा मित्र रमेश वर्मा या दोघांनी आपसात संगणमत करून १९ ऑक्टोबर रोजी सदर महिला राहत असलेल्या इमारतीमध्ये घरात घुसून महिलेच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने पेटविली. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत .
 

Web Title: In Bhiwandi, a woman was set on fire by pouring kerosene out of anger at the break-up of a love affair