शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

धक्कादायक! बंगळुरूमध्ये बाईकस्वाराने लिफ्ट देऊन विद्यार्थीनीवर केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2024 17:15 IST

गेल्या काही दिवसापूर्वी कोलकातामध्ये एका महिला डॉक्टरवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.

गेल्या काही दिवसापूर्वी कोलकाता येथे एका महिला डॉक्टरवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली होती. आता एका आठवड्यातच बंगळुरू येथून एक अशीच घटना समोर आली आहे. बंगळुरूमध्ये, रविवारी पहाटे एका अज्ञात मोटरसायकलस्वाराने एका मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. ही मुलगी शहरातील एका महाविद्यालयाची अंतिम वर्षाची विद्यार्थिनी होती आणि कोरमंगला येथे एका कार्यक्रमानंतर हेब्बागोडी येथील तिच्या घरी परतत होती. ज्या व्यक्तीकडून तिने लिफ्ट घेतली होती, त्यानेच तिच्यावर बलात्कार केल्याचे समोर आले आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही तरुणी कोरमंगला येथे एका कार्यक्रमाला गेली होती. लिफ्ट देणाऱ्या मुलाला संशयित आरोपी म्हणून अटक केले आहे. तिला लिफ्ट देणाऱ्या व्यक्तीवर बलात्काराचा संशय असून चौकशी सुरू आहे.

आई-वडिलांच्या मृत्यूनंतर बहिणीने घराबाहेर काढले, 6 नराधमांनी केला सामूहिक अत्याचार…

पोलिसांनी सांगितले की,  पोलीस अधिकारी घटनास्थळी गेले होते आणि त्यांनी पीडिता आणि तिच्या नातेवाईकांशी बोलले आहेत. आम्ही सर्व माहिती गोळा केली असून पाच टीम तयार केल्या आहेत. आम्ही तपास करत असून लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल.

कोलकात्यात महिला डॉक्टरची हत्या

कोलकात्याच्या आरजी कार रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. डॉक्टरवर बलात्कार करून खून केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी डॉक्टर संजय रॉयला अटक केली आहे. या घटनेचा देशभरात निषेध नोंदवला जात आहे. मात्र बुधवारी रात्री या प्रकरणाने वेगळं वळण घेतलं. रात्री उशिरा अज्ञातांनी आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलची तोडफोड केली.  प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ मध्यरात्री ही तोडफोड झाल्याचे म्हटलं जात आहे. पोलिसांनी फेसबुकवर दंगलखोरांचा फोटो शेअर केली आहेत आणि त्यांच्याबद्दल लोकांकडून माहिती मागवली आहे. दुसरीकडे, तोडफोड करणारे एवढे आक्रमक झाले होते की पोलिसांवर लपून राहण्याची वेळ आली.

आरजी कार हॉस्पिटलमध्ये झालेल्या तोडफोडीदरम्यान सोशल मीडियावर काही व्हिडिओ समोर आले आहेत. शेकडो लोकांचा जमाव हॉस्पिटलमध्ये कसा घुसला, गोंधळ घातला आणि डॉक्टरांना लक्ष्य कसे केले, हे या व्हिडिओंमध्ये दिसून आले. ४० लोकांचा एक गट हॉस्पिटलच्या आवारात घुसला. त्यांनी मालमत्तेचे नुकसान केले आणि पोलिसांवर दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या वापराव्या लागल्या. मात्र तरीही जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस