थरारक! लग्नातच नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला; ड्रोनद्वारे आरोपीचा २ किमी पाठलाग केला, मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 17:09 IST2025-11-12T17:08:50+5:302025-11-12T17:09:57+5:30
हे सगळे दृश्य ड्रॉन कॅमेऱ्यात कैद झाले. ज्यामुळे पोलिसांना महत्त्वाचे पुरावे सापडले. या घटनेबाबत बडनेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

थरारक! लग्नातच नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला; ड्रोनद्वारे आरोपीचा २ किमी पाठलाग केला, मग...
अमरावती - शहरातील बडनेरा भागात मंगळवारी रात्री एका लग्न सोहळ्यात रक्तरंजित संघर्ष पाहायला मिळाला. साहिल लॉनमध्ये सुरू असलेल्या लग्नात व्यासपीठावर जात एका युवकाने नवऱ्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात नवरदेव गंभीर जखमी झाला. या घटनेने लग्न सोहळ्यात गोंधळ उडाला. त्यात ही पूर्ण घटना ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाली. ज्याआधारे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.
माहितीनुसार, २२ वर्षीय युवक सुजल समुद्रे याचे सोमवारी रात्री ९.३० च्या सुमारास लग्न होते. त्यावेळी आरोपी राघव बक्शी हा व्यासपीठावर आला. त्याने चाकूने नवऱ्याच्या मांडीवर आणि गुडघ्याजवळ वार केले. या हल्ल्यात नवरदेव रक्कबंबाळ झाला. त्यामुळे लग्न सोहळ्यात गोंधळ माजला. सगळे इकडे तिकडे धावू लागले. डिजेवर नाचताना लागलेल्या धक्क्यातून या वादाची सुरुवात झाली होती. क्षुल्लक कारणामुळे हा वाद टोकाला पोहचला. त्यात आरोपीने रागाच्या भरात चाकू हल्ला केला. या हल्ल्यानंतर आरोपी तिथून पळून जात होता तेव्हा तिथे असणाऱ्यांनी अडवले असता त्याने नवऱ्याच्या वडिलांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
महाराष्ट्र: दूल्हे पर हमला, ड्रोन कैमरे में कैद हुई वारदात। बडनेरा इलाके में शादी समारोह के दौरान मंच पर ही दूल्हे पर जानलेवा हमला। इसके बाद ड्रोन कैमरे ने करीब 2 किलोमीटर तक हमलावरों का पीछा किया।
— indianletter (@indianlett31083) November 12, 2025
#DroneCamera#Attack#Amravati#Badnera#Maharashtra#IndianLetterpic.twitter.com/G4NV0IZz1I
हे सगळे दृश्य ड्रॉन कॅमेऱ्यात कैद झाले. ज्यामुळे पोलिसांना महत्त्वाचे पुरावे सापडले. या घटनेबाबत बडनेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाची पोलीस चौकशी सुरू आहे. हल्ल्यानंतर जखमी नवरदेवाला रिम्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केला. ज्याठिकाणी त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. आरोपी राघव बक्शी हा फरार असून त्याला लवकरच अटक केली जाईल असं पोलिसांनी सांगितले. विशेष म्हणजे या हल्ल्यानंतर ड्रोन ऑपरेटरच्या सतर्कतेमुळे आरोपीची ओळख पटवणे सोपे गेले. हल्ल्यानंतर आरोपी फरार झाला, तेव्हा २ किमी पर्यंत ड्रोनने त्याचा पाठलाग केला होता.