Punjab Crime: पंजाबच्या एका महाविद्यालयात आज सकाळी रक्ताचा सडा पडला. तरनतारन येथील एका लॉ कॉलेजमध्ये सोमवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास थरार घडला. कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या अभिराज सिंग या विद्यार्थ्याने संदीप कौर (२०) हिच्या डोक्यात पिस्तूल रोखून गोळी झाडली. संदीपचा जागीच मृत्यू झाल्याचे पाहून अभिराजने त्याच पिस्तूलने स्वतःवरही गोळी झाडून घेतली. हा सगळा धक्कादायक प्रकार वर्गातल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वर्गात लेक्चर सुरू झाले नव्हते. सर्व विद्यार्थी आपापल्या जागी बसलेले असताना अभिराज बॅगेत पिस्तूल घेऊन वर्गात घुसला. तो थेट पहिल्या वर्षात शिकणाऱ्या संदीप कौर हिच्या बेंचपाशी पोहोचला. काही वेळ दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि संतापलेल्या अभिराजने पॉइंट ब्लँक रेंजवरून संदीपच्या डोक्यात गोळी झाडली. संदीप रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळताच, अवघ्या काही सेकंदात अभिराजने स्वतःच्याही डोक्याला पिस्तूल लावून ट्रिगर दाबला.
प्रपोज नाकारल्याचा राग?
ही घटना एकतर्फी प्रेमातून घडल्याचा संशय आहे. ८ फेब्रुवारी रोजी अभिराजने संदीपला प्रेमाची मागणी घातली होती, परंतु संदीपने ती फेटाळून लावली. याच नकाराचा बदला घेण्यासाठी त्याने आज हे टोकाचे पाऊल उचलल्याचे चर्चा सर्वत्र सुरु आहे.
दुसरीकडे, संदीपच्या आईने कॉलेज व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले आहेत. "मला फोन करून सांगण्यात आले की, मुलीचे छोटेसे भांडण झाले असून तिला किरकोळ दुखापत झाली आहे. पण जेव्हा मी कॉलेजमध्ये पोहोचले, तेव्हा माझ्या पोटच्या लेकीचा मृतदेह समोर होता," असे सांगत आईने टाहो फोडला. संदीपचे वडील हयात नसून, ६ बहिणी आणि एका भावात ती मोठी होती. विद्यार्थी वर्गात पिस्तूल घेऊन कसा पोहोचला? कॉलेजमध्ये सुरक्षा व्यवस्था का नव्हती? असे संतप्त सवाल आता पालकांनी उपस्थित केले असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
शस्त्राचा शोध सुरू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले असून कॉलेज सील केले आहे. "आरोपीने हे पिस्तूल कोठून आणले, याचा तपास सुरू आहे. ते परवानाधारक शस्त्र होते का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही," असे पोलिसांनी सांगितले.
Web Summary : In Punjab, a law student fatally shot a female classmate after she rejected his advances. He then killed himself. The shocking incident, captured on CCTV, has sparked outrage and raised questions about college security. Police are investigating the source of the weapon.
Web Summary : पंजाब के एक लॉ कॉलेज में एक छात्र ने एक छात्रा को प्रेम प्रस्ताव अस्वीकार करने पर गोली मार दी, जिससे उसकी मौत हो गई। फिर उसने खुद को भी गोली मार ली। सीसीटीवी में कैद इस घटना से आक्रोश है और कॉलेज सुरक्षा पर सवाल उठे हैं। पुलिस जांच कर रही है।