शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

२४ तासांत लष्कराने घेतला बदला, राहुल भट्टची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना घातले कंठस्नान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 9:28 PM

Encounters Breaks Out : काश्मीरच्या आयजींनी सांगितले की, अलीकडेच लष्करचे दोन पाकिस्तानी दहशतवादी घुसखोरी करून भारतात घुसले होते.

जम्मू काश्मीर : काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांच्या हत्येनंतर सुरक्षा दलांनी त्यांची पत्नी मीनाक्षी हिला दोन दिवसांत दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचे आश्वासन दिले होते. लष्कराने २४ तासांत आपले वचन पूर्ण केले. त्यांनी शुक्रवारी संध्याकाळी बांदीपोरामध्ये तीन दहशतवाद्यांना ठार केल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आली आहे. यामध्ये मारले गेलेले दोन दहशतवादी राहुल भट्टच्या हत्येत सामील होते. तिसरा दहशतवादी गुलजार अहमद असून त्याची ओळख 11 मे रोजी झाली होती. बडगाम जिल्ह्यातील चदूरा तहसीलदार कार्यालयामध्ये महसूल अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या राहुल भट्ट यांची गुरुवारी कार्यालयात घुसून दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची माहिती आहे.पाकिस्तानातून दोन दहशतवादी घुसले होतेकाश्मीरच्या आयजींनी सांगितले की, अलीकडेच लष्करचे दोन पाकिस्तानी दहशतवादी घुसखोरी करून भारतात घुसले होते. बांदीपोरा येथे सुरक्षा दलांची त्यांच्याशी चकमक झाली. 11 मे रोजी दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान दोघेही पळून गेले आणि सालिंदर जंगल परिसरात लपले.

काल काश्मिरी पंडिताची तर आज पोलीस कॉन्स्टेबलची घरात घुसून हत्या, २४ तासांत दुसरी घटनालेफ्टनंट गव्हर्नरांनीही आश्वासन पूर्ण केलेलेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी काही तासांपूर्वी ट्विट करून राहुल भट्ट यांच्या नातेवाईकांची भेट घेतल्याचे सांगितले होते. मी भट्ट यांच्या कुटुंबाला न्याय दिला. दहशतवाद्यांना आणि त्यांच्या समर्थकांना या गुन्ह्याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.राहुलच्या ऑफिसमधील काही लोकांवर संशयराहुल भट्ट यांची पत्नी मीनाक्षी हिने आज तकला सांगितले की, तिचे पतीशी १० मिनिटांपूर्वीच बोलणे झाले होते. लवकर या वाढदिवसाला जाऊ असं ती म्हणाली होती. त्यावर राहूल यांनी ठीक आहे असं म्हटलं, त्यानंतर मला कळले की, दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या. तिने सांगितले की, पतीच्या कार्यालयात काम करणाऱ्या काही लोकांवर तिला संशय आहे की ते दहशतवाद्यांसोबत पतीची हत्या करण्याच्या कटात सामील आहेत.दहशतवादी हालचालींबाबत सतर्कताAaj Tak ला मिळालेल्या माहितीनुसार, गुप्तचर यंत्रणांनी दहशतवादी हल्ल्याबाबत सुरक्षा दलांना अलर्ट जारी केला होता. 10 मे रोजी बांदीपोरा भागात तीन अज्ञात दहशतवाद्यांच्या हालचाली टिपण्यात आल्याचे अलर्टमध्ये म्हटले आहे. हे दहशतवादी सतत त्यांचे ठिकाण बदलत होते. हे दहशतवादी सुरक्षा दल, सुरक्षा दलांची वाहने आणि पिकेट्स यांना लक्ष्य करू शकतात.30 एप्रिल रोजी तीन दहशतवादीही दिसले होतेबांदीपोरामध्ये 10 मे पूर्वी, 30 एप्रिललाही तीन दहशतवाद्यांचे लोकेशन ट्रॅक करण्यात आले होते. त्यापैकी दोन पाकिस्तानी दहशतवादी होते. दोन्ही पाकिस्तानी दहशतवादी उर्दू भाषिक आहेत. त्यांच्यासोबत एक स्थानिक दहशतवादीही होता. दोन पाकिस्तानी नागरिकांसोबत पकडलेला तिसरा दहशतवादी स्थानिक भाषा बोलत होता.

 

टॅग्स :terroristदहशतवादीSoldierसैनिकJammu Kashmirजम्मू-काश्मीरFiringगोळीबार