अनैतिक संबंधातून प्रियकराने ग्रॅन्डरच्या साहाय्याने प्रेयसीचा चिरला गळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2020 22:03 IST2020-11-19T22:02:10+5:302020-11-19T22:03:13+5:30
Murder : अचानक दोघांचे मृतदेह अंबरनाथच्या प्रसादम रेसिडेन्सीमध्ये सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

अनैतिक संबंधातून प्रियकराने ग्रॅन्डरच्या साहाय्याने प्रेयसीचा चिरला गळा
अंबरनाथ - अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रामधील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या प्रियकराने आपल्या मित्राच्या पत्नीसोबत विवाहबाह्य संबंध ठेवले होते. मात्र या संबंधांना तिच्या पतीने विरोध केल्यानंतर देखील त्यांनी आपले भेटीगाठी सुरू ठेवल्या होत्या. मात्र अचानक दोघांचे मृतदेह अंबरनाथच्या प्रसादम रेसिडेन्सीमध्ये सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
दादर परिसरात खळबळ! प्रेमसंबंध तोडल्याने प्रियकराने प्रेयसीवर केले सपासप वार
अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रातील एका खाजगी कंपनीमध्ये अजित सहा आणि संदीप सक्सेना हे दोघे मित्र काम करत होते. मात्र संदीप सक्सेना आणि अजित सहा याची पत्नी जयंती यांचे प्रेम संबंध होते. मात्र या संबंधांना जयंतीचे पती अजित सहा यांनी विरोध केला होता. मात्र कालांतराने त्यांचे प्रेमसंबंध अधिक घट झाल्याने ते अजित त्याच्या नकळत देखील भेटू लागले.दरम्यान ही महिला 17 तारखेपासून बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या पतीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात केली होती. त्यानंतर गुरुवारी जयंती आणि तिचा प्रियकर संदीप यांचे मृतदेह अंबरनाथमध्ये सापडले आहेत. ग्रॅन्डर चा वापर करून प्रियकराने आधी प्रेयसीचा गळा चिरला आणि त्यानंतर स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.