धक्कादायक! विवाहित मुलगी प्रियकरासह पळून गेली, नातेवाईकांनी तरुणाचे नाक कापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 19:20 IST2023-03-20T19:17:41+5:302023-03-20T19:20:43+5:30
राजस्थानमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

धक्कादायक! विवाहित मुलगी प्रियकरासह पळून गेली, नातेवाईकांनी तरुणाचे नाक कापले
राजस्थानमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, राजस्थान येथील नागौर येथील एक विवाहित महिला एका तरुणासोबत पळून गेली. या प्रकरणी त्या तरुणाला मुलीकडच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याचे प्रकरण समोर आले आहे, यात या तरुणाचे नाक कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नातेवाईकांना ताब्यात घेतले आहे.
नातेवाइकांनी तरुणाला अगोदर बेदम मारहाण केली. त्यानंतर विळ्याने त्याचे नाक कापण्यात आले. तरुण आणि तरुणी दोघांचेही लग्न झाले असून त्यांचे प्रेमप्रकरण अनेक दिवसांपासून सुरू होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
फेसबुकवरुन मैत्री झाली, प्रेम झालं, लग्नाच आमिष दाखवलं; मित्रांसोबत केला सामूहिक बलात्कार
हा व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी कारवाई करत पाच आरोपींना अटक केली. आरोपींनी आधी तरुणाला बेदम मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. पीडितेने सांगितले की, स्थानिक लोकांनी रक्तस्त्राव अवस्थेत त्याला परबतसर येथील रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्यांना अजमेरला दाखल केले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती देऊन गुन्हा दाखल केला.
पाच ते सात तरुण त्यांच्या घरी आले आणि त्यांनी त्यांचे व विवाहित महिलेचे अपहरण केले. दोघांनाही आधी बेदम मारहाण करण्यात आली आणि नंतर विळ्याने त्याचे नाक कापण्यात आले.
या प्रकरणी पोलिसांनी प्रेयसीच्या चार भावांना आणि तिच्या वडिलांना अटक केली आहे. त्यांची चौकशी करण्यात येत आहे. पीडित तरुणाला गंभीर अवस्थेत स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना अजमेरला रेफर करण्यात आले. या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.