शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

शिक्रापूर पोलिसांनी छापा टाकत तीस ते चाळीस लाखांचा गुटखा केला जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 3:23 PM

मोठ्या प्रमाणात गुटखा साठवला जात असल्याची माहिती पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती.. 

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील चाकण रोड परिसरातील मांढरे वस्ती याठिकाणी एका इमारतीमध्ये पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या शिक्रापूर पोलिसांनी छापा टाकत सुमारे तीस ते चाळीस लाखांचा अवैधरित्या साठविलेल्या गुटख्याच्या साठ्यासह तीन वाहने जप्त केली आहे.         पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्रापूर येथील चाकण रोड मांढरे वस्ती परिसरात एका इमारतीच्या आतमध्ये तीन खोल्यांमध्ये काही अवैधरित्या गुटख्याचा साठा केल्याची माहिती शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके, पोलीस नाईक तेजस रासकर, रविकिरण जाधव, अंबादास थोरे, अशोक केदार, विकास मोरे यांच्या पथकाने त्याठिकाणी छापा टाकल्यावर तीन वाहने तसेच इमारतीच्या खोल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा साठा मिळून आला. तर त्या ठिकाणी अंदाजे तीस लाख ते पस्तीस लाख रुपयांचा गुटखा असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. मात्र तिथे किती दिवसांपासून गुटखा साठविला जात आहे ? तो कुठून येत आहे ? याबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही.

याविषयी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके यांनी सांगितले, शिक्रापूर येथील चाकण रोड परिसरातील मांढरे वस्ती याठिकाणी मोठ्या प्रमाणात गुटखा साठवला जात असल्याची असल्याची गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. त्यानंतर तिथे छापा टाकला असता मोठ्या प्रमाणात गुटखा मिळून आला आहे.  याबाबत अन्न व औषध प्रशासनाला माहिती दिलेली आहे. तसेच मिळून आलेल्या गुटख्याचे मोजमाप सुरु आहे.पुढील तपास शिक्रापूर पोलिस करत आहेत .

टॅग्स :Shikrapurशिक्रापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक