"२० मिनिटांत घरी पोहचते..." मुलीचा आईला अखेरचा कॉल; युवक-युवतीचा संशयास्पद मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 08:41 IST2026-02-17T08:41:08+5:302026-02-17T08:41:39+5:30

शुक्रवारी रेखा तिच्या ऑफिसमधून बाहेर निघाली होती तेव्हा तिने आईला फोन करून ती १५ ते २० मिनिटांत घरी पोहचेन असं सांगितले

"I'll be home in 20 minutes..." Daughter's last call to mother; Suspicious death of sumit and rekha in Noida | "२० मिनिटांत घरी पोहचते..." मुलीचा आईला अखेरचा कॉल; युवक-युवतीचा संशयास्पद मृत्यू

"२० मिनिटांत घरी पोहचते..." मुलीचा आईला अखेरचा कॉल; युवक-युवतीचा संशयास्पद मृत्यू

नोएडा - उत्तर प्रदेशातील नोएडा सेक्टर १०७ मध्ये सुमित आणि रेखा यांच्या संशयास्पद मृत्यूने या प्रकरणाचा गुंता वाढला आहे. पोलिसांनी या दोघांचे मोबाईल फोन फॉरेन्सिक लॅबला पाठवले आहेत. या दोघांच्या मोबाईलमधील डेटा शोधण्याचा काम तपासात केले जात आहे. हे दोघेही शुक्रवारी रात्री कुठे कुठे गेले, त्यांच्यात शेवटचे बोलणे काय झाले होते याचा तपास पोलीस करत आहेत.

माहितीनुसार, मोबाईलमधील कॉल डिटेल रेकॉर्ड, चॅट आणि लोकेशन हिस्ट्री याची कसून पडताळणी करण्यात येत आहे. घटनेच्या आधी दोघांमध्ये काय संवाद झाला होता आणि या दोघांमध्ये कुठला वाद सुरू होता का याचीही पोलीस चौकशी सुरू आहे. रेखाच्या कुटुंबाने तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकणे सुरू केले होते. त्याचवेळी सुमित कथितपणे वेगवेगळ्या नंबरवरून रेखाला कॉल करत होता. रेखाच्या कुटुंबाने याला विरोध करत सुमित विरोधात पोलीस ठाण्यात तक्रारही केली होती. त्यानंतर सुमितने एकदा लिखितपणे रेखाच्या कुटुंबाची माफी मागितल्याचेही समोर आले आहे.

आईला केला होता अखेरचा कॉल

शुक्रवारी रेखा तिच्या ऑफिसमधून बाहेर निघाली होती तेव्हा तिने आईला फोन करून ती १५ ते २० मिनिटांत घरी पोहचेन असं सांगितले. घरातील लोक रेखाची वाट पाहत होते. त्याचवेळी रस्त्यात सुमित रेखाला भेटला आणि तो तिला त्याच्या कारमध्ये बसवून सोबत घेऊन गेला. त्यानंतर पुढे काय झाले हा घटनाक्रम पोलीस तपासात शोधत आहेत. फॉरेन्सिक रिपोर्टनंतर या प्रकरणातील आणखी काही गोष्टी उघड होतील. मोबाईल कॉल डेटातून या दोघांमधील संवाद आणि वादाचा विषय, कुणाशी बोलणे झाले हे स्पष्ट होईल. या घटनेतील प्रत्येक अँगलची पोलीस चौकशी करत असून त्या दिशेने पुढील तपास सुरू आहे. 

दरम्यान, प्राथमिक तपासात मागील १५ वर्षापासून सुमित आणि रेखा एकमेकांना ओळखत होते आणि या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. या दोघांना एकमेकांशी लग्न करायचे होते, परंतु रेखाच्या घरच्यांनी तिचे लग्न दुसऱ्याशी ठरवले होते. त्यामुळे प्रियकर सुमित नाराज होता. ज्या कारमध्ये या दोघांचा मृतदेह सापडला ती कार आतून बंद होती. या घटनास्थळी पोलिसांना बंदूक आणि ६-७ जिवंत कारतूस सापडली. सुमितने आधी प्रेयसी रेखाला गोळी मारली आणि त्यानंतर त्याच बंदुकीने त्याने आत्महत्या केली असा अंदाज आहे. मात्र सुमितकडे बंदूक आली कुठून याचेही उत्तर पोलीस शोधत आहेत. 

Web Title : लड़की का आखिरी कॉल, 'घर पहुँच रही हूँ': युगल की संदिग्ध मौत।

Web Summary : नोएडा में युगल की मौत की गुत्थी उलझी, पुलिस जाँच में जुटी। परिवार का लड़की पर शादी का दबाव था, प्रेमी नाराज़ था। कार में बंदूक मिली, युवक ने प्रेमिका को गोली मारकर आत्महत्या की।

Web Title : Girl's last call, 'Reaching home': Suspicious death of couple.

Web Summary : Noida couple's death deepens as police investigate phones. Family pressure on the girl to marry another, boyfriend was upset. The man allegedly shot his girlfriend before killing himself with a gun found in the car.