विद्यार्थिनीचा अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या ऑफिसरला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 19:58 IST2020-02-20T19:55:56+5:302020-02-20T19:58:03+5:30
शुभम बॅनर्जी असे या प्रोजेक्ट ऑफिसरचे नाव असून एका पीएचडीच्या विद्यार्थिनीने केलेल्या तक्रारीवरून त्याला अटक केली आहे.

विद्यार्थिनीचा अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या ऑफिसरला अटक
चेन्नई : IIT-M म्हणजे आयआयटी मद्रासमध्ये एयरोस्पेस इंजीनियरिंग विभागातील एका प्रोजेक्ट ऑफिसरला पोलिसांनी अटक केली आहे. शुभम बॅनर्जी असे या प्रोजेक्ट ऑफिसरचे नाव असून एका पीएचडीच्या विद्यार्थिनीने केलेल्या तक्रारीवरून त्याला अटक केली आहे.
लेडीज टॉयलेटमध्ये प्रोजेक्ट ऑफिसर तिचा व्हिडिओ काढत होता, असे या विद्यार्थिनीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. ज्यावेळी लेडीज टॉलेटमध्ये विद्यार्थिनी गेली होती, त्यावेळी बाजूला असलेल्या जेंट्स टॉयलेटमधून प्रोजेक्ट ऑफिसर भिंतीच्या छिद्रातून तिचा व्हिडीओ काढत होता, असे विद्यार्थिनीने म्हटले आहे.
ज्यावेळी प्रोजेक्ट ऑफिसर व्हिडीओ काढत असल्याचे समजते. त्यावेळी ही विद्यार्थिनी लेडीज टॉयलेटमधून लगेच बाहेर आली आणि तिने जेंट्स टॉयलेट्सचा दरवाजा बाहेरून लॉक केला. त्यानंतर विद्यार्थिनीने सुरक्षा कर्मचारी आणि इतर विद्यार्थिनींना बोलविले. या सर्वांसमोर जेंट्स टॉयलेट ओपन केले असता आत एयरोस्पेस इंजीनियरिंग विभागाचा प्रोजेक्ट मॅनेंजर शुभम बॅनर्जी होता.
याप्रकरणी विद्यार्थिनीने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांच्या चौकशीदरम्यान शुभम बॅनर्जी टॉयलेटमध्ये विद्यार्थिनीचा व्हिडीओ काढत असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी पोलिसांनी शुभम बॅनर्जी याला अटक केली आहे.