खळबळजनक! ३ वर्षे इंजिनिअरने केले रुग्णांवर उपचार; भावोजींची डिग्री, पण औषधं द्यायचा मेहुणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 11:40 IST2025-12-12T11:39:18+5:302025-12-12T11:40:10+5:30
गेल्या तीन वर्षांपासून जिल्हा रुग्णालयात हृदयविकार तज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेला डॉक्टर खरंतर डॉक्टर नव्हताच, तो एक इंजिनिअर होता.

फोटो - आजतक
ललितपूर जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजमध्ये मोठी खळबळ उडाली आहे, एका महिलेने कॉलेज प्रशासनासमोर असा खुलासा केला, ज्यामुळे संपूर्ण आरोग्य व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. असा आरोप आहे की, गेल्या तीन वर्षांपासून जिल्हा रुग्णालयात हृदयविकार तज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेला डॉक्टर खरंतर डॉक्टर नव्हताच, तो एक इंजिनिअर होता, ज्याने आपल्या भावोजीच्या डिग्रीचा वापर करून बनावट कागदपत्रं बनवली आणि नोकरी मिळवली.
हे प्रकरण समोर येताच मेडिकल कॉलेज प्रशासन तातडीने कामाला लागलं. आरोपी डॉक्टर ज्याचं खरंनाव अभिनव सिंह असल्याचं सांगितलं जात आहे. जिल्हा मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. मयंक शुक्ला यांनी सांगितलं की, हे प्रकरण तेव्हा उघडकीस आलं जेव्हा स्वतः डॉक्टर असल्याचं सांगणारी एक महिला त्याची भेट घेण्यासाठी आली. तिने तक्रार दाखल केली की, मेडिकल कॉलेजमध्ये नियुक्त असलेले डॉ. राजीव गुप्ता हे तिचे पती आहेत.
धक्कादायक! दारुच्या नशेत होता बोगस डॉक्टर; YouTube पाहून ऑपरेशन, चुकीची नस कापली अन्...
महिलेने दिलेल्या माहितीनुसार, तिचा भाऊ अभिनव सिंह याने तिच्या पतीचं डॉक्टरेट सर्टिफिकेट आणि कागदपत्रांवर आपलं नाव टाकून बनावट ओळख तयार केली आणि मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टरची नोकरी मिळवली. हा खुलासा होताच कॉलेज प्रशासनाच्या पायाखालची जमीन सरकली. चौकशीत ही गोष्ट समोर आली आहे की, या बनावट डॉक्टरची नियुक्ती वर्ष २०२२ मध्ये नॅशनल हेल्थ मिशन (NHM) च्या माध्यमातून झाली होती.
धक्कादायक बाब म्हणजे तीन वर्षांपर्यंत कोणालाही त्याच्या पात्रतेवर शंका आली नाही. तो डॉक्टरप्रमाणेच कपडे परिधान करत होता, रुग्णांची तपासणी करत होते, रिपोर्ट वाचत होता आणि औषधोपचार लिहित हाते. डॉ. शुक्ला यांनी सांगितलं की, तीन वर्षे तो जिल्ह्यातील सर्वात संवेदनशील विभागात रुग्णांवर उपचार करत राहिला. तो प्रत्यक्षात डॉक्टर नसून इंजिनिअर आहेत, याची कोणी कल्पनाही केली नसेल. याप्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.