शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष भोवले ; तीन पोलीस हवालदार निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 3:39 PM

अवैध धंद्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामीण पोलीस दलातील तिघा पोलीस हवालदारांना चांगलेच भोवले आहे़.

पुणे : अवैध धंद्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामीण पोलीस दलातील तिघा पोलीस हवालदारांना चांगलेच भोवले आहे़. त्यांच्या हद्दीत अवैध धंदे चालू असल्याने पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांना निलंबित केले़. रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अमिरुद्दीन रफीरद्दीन चमनशेख, लोणीकंद पोलीस ठाण्याचे हवालदार डी़ सी़ बेंद्रे व डी़ एऩ गायकवाड अशी त्यांची नावे आहेत़. रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आयसीआयसी बँकेसमोरील सुखकर्ता एंटरप्रायझेस दुकानाजवळील पत्र्याच्या शेडमध्ये जुगारावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई करुन ३० हजार ६७० रुपयांची जुगाराची साधने जप्त केली़. तसेच लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघोली बीट अंतर्गत वाघोली गावातील खांदवेनगर येथे पत्र्याच्या शेडलगत जुगारावर छापा घातला होता़. कल्याण मटका चालविणाऱ्या ६ जणांविरुद्ध कारवाई करुन १३ हजार ८१० रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त केले होते़. या अवैध धंद्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली़. त्यात या तीन कर्मचाऱ्यांनी या धंद्यांवर प्रभावीपणे कारवाई करण्यात गंभीर स्वरुपाची दिरंगाई केल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करुन निलंबित करण्यात आले आहे़. अवैध धंद्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या व त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध यापुढे कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे धोरण राबविण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिले आहेत़. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी