शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 17:05 IST

एकतर्फी प्रेमामुळे एका १९ वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला. या तरुणाने, प्रेयसीने "माझ्यासाठी मर" असे म्हटल्यानंतर विषारी पदार्थ पिऊन आत्महत्या केली.

बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे, जिथे एकतर्फी प्रेमामुळे एका १९ वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला. दीपक नावाच्या या तरुणाने, प्रेयसीने "माझ्यासाठी मर" असे म्हटल्यानंतर विषारी पदार्थ पिऊन आत्महत्या केली.

मृत तरुण दीपक हा बांका जिल्ह्यातील अमरपूर येथील धनंजय मंडल यांचा एकुलता एक मुलगा होता. दीपक भागलपूरमधील खंजरपूर येथे भाड्याच्या घरात राहत होता आणि एका खासगी क्लिनिकमध्ये काम करत होता. एका महिन्यापूर्वी एका लग्न समारंभात त्याची एका मुलीशी ओळख झाली. ही ओळख लवकरच मैत्रीत बदलली आणि दीपक त्या मुलीच्या प्रेमात पडला.

दीपकचा मित्र मनीषच्या म्हणण्यानुसार, त्या मुलीला भेटून एक महिन्यापेक्षा कमी वेळ झाला होता. ७ मे रोजी झालेल्या भेटीनंतर अवघ्या १० दिवसांत ते दोघे सोशल मीडियावर बोलू लागले. मुलीने दीपककडून तब्बल ५० हजार रुपये खर्च करून घेतल्याचे मनीषने सांगितले. यानंतर काही दिवसांनी मुलीने दीपकशी बोलणे बंद केले, ज्यामुळे दीपक खूप अस्वस्थ झाला.

म्हणाली "माझ्यासाठी मर"!मुलीने अचानक संपर्क तोडल्याने दीपक प्रचंड मानसिक दबावाखाली होता. त्याच्या मृत्यूनंतर मित्रांनी तपासले असता, दीपकने मुलीच्या सोशल मीडिया चॅट बॉक्समध्ये वारंवार विनंत्या केल्याचे समोर आले. "माझ्याशी बोल" असे दीपकने अनेकदा लिहिले होते. यावर मुलीने दिलेले उत्तर धक्कादायक होते – "जर तू माझ्यावर प्रेम करतोस तर सिद्ध कर, माझ्यासाठी मर..." या मेसेजनंतरच दीपकने विषारी पदार्थ प्राशन केले.

दीपकला तात्काळ मायागंज रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृताच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात अद्याप कोणालाही दोषी ठरवलेले नाही आणि गुन्हाही नोंदवलेला नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहारUttar Pradeshउत्तर प्रदेश