"तू काम नाही सोडले तर तुझा खात्मा करेन", तलवारीने धमकावणाऱ्या मच्छीमाराचाच काढला काटा    

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 07:34 PM2021-10-24T19:34:59+5:302021-10-24T19:35:44+5:30

Murder Case :मच्छी विक्रीच्या व्यवसायावरून वाद, धमकावणाऱ्याची हत्या; आरोपीला अटक

"If you don't quit, I'll kill you", man was killed by a young man after dispute in dombivli | "तू काम नाही सोडले तर तुझा खात्मा करेन", तलवारीने धमकावणाऱ्या मच्छीमाराचाच काढला काटा    

"तू काम नाही सोडले तर तुझा खात्मा करेन", तलवारीने धमकावणाऱ्या मच्छीमाराचाच काढला काटा    

Next
ठळक मुद्देयाप्रकरणी वहिनीकडे काम करणा-या हितेश उर्फ काल्या संजय नकवाल याला टिळकनगर पोलिसांनी अटक केली आहे.

डोंबिवली -  मच्छी विक्रीच्या व्यवसायात वहिनीला मदत करतो या कारणावरून झालेल्या वादात तलवारीने भानुदास उर्फ मुकूंद दत्तु चौधरी यांची हत्या झाल्याची घटना शनिवारी रात्री आठ वाजता पुर्वेकडील खंबाळपाडा परिसरात घडली. याप्रकरणी वहिनीकडे काम करणा-या हितेश उर्फ काल्या संजय नकवाल याला टिळकनगर पोलिसांनीअटक केली आहे.

खंबाळपाडा परिसरात राहणारे 55 वर्षीय भानुदास यांचा मच्छी विक्रीचा व्यवसाय होता. त्यांच्या वहीणीचा देखील मच्छी विक्रीचा व्यवसाय आहे. वहिनीला हितेश मदत करायचा या कारणावरून भानुदास आणि हितेश यांच्यात वारंवार भांडण व्हायचे. शनिवारी देखील त्यांच्यात पुन्हा या कारणावरून वाद उफाळून आला. यावेळी भानुदास यांनी त्यांच्या जवळील तलवार बाहेर काढली. हितेशला तलवार दाखवित पुन्हा धमकाविले की, आता तू काम नाही सोडले तर याच तलवारीने तुझा खात्मा करेन.

यावेळी झालेल्या झटापटीत भानुदास यांच्या हातातील तलवार हितेशने हिसकावून घेत त्यांच्या गळयावर, हातावर आणि डोक्यावर वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या भानुदास यांचा जागेवरच मृत्यू झाला. याची माहीती मिळताच टिळकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ही हत्या जमिनीच्या वादातून झाल्याची चर्चा परिसरात आहे. दरम्यान हत्या मच्छी विक्रीच्या व्यवसायात वहीणीला मदत करतो यावरून झालेल्या वादात झाली की अन्य कारणावरून याचा तपास सुरू असल्याची माहीती वरीष्ठ पोलिस निरिक्षक अजय आफळे यांनी दिली. अटक आरोपी हितेश मुळचा राजस्थान येथील रहिवाशी आहे सध्या तो खंबाळपाडा परिसरातील एका चाळीत वास्तव्याला होता. 

Web Title: "If you don't quit, I'll kill you", man was killed by a young man after dispute in dombivli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app