शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

मुलीला त्रास दिला तर बघ असे म्हटले अन् आरोपीने चाकूने सपासप वार केले!

By संतोष वानखडे | Updated: May 27, 2023 18:46 IST

मानोऱ्यातील चाकूहल्ला प्रकरणाचा उलगडा ; दोघांना अटक

वाशिम : मानोरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात २६ मे रोजी काही युवकांनी केलेल्या चाकुहल्ल्यात एक जण ठार तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणातील सहा आरोपींविरुद्ध पोलिसांनी २६ मे रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला असून दोन आरोपींना अटक केली. मुलीला त्रास दिला तर बघ असे म्हटले असता आरोपीने दोघांवरही सपासप वार केले होते.

फिर्यादी अनंता साहेबराव कुडवे (वय २०) रा. बेलोरा यांच्या तक्रारीनुसार, फिर्यादची चुलत मामे बहिण ही मांगकिन्ही (ता.दारव्हा) येथे राहत असून, चुलत बहिणीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी अनंता हा २५ मे रोजी मांगकिन्ही येथे गेलो होता. यावेळी  गावातील प्रविण मळघने हा त्रास देत असून, त्याला समजावून सांगा, असे मामेबहिणीने अनंता यास सांगितले होते. यावरून अनंताने २६ मे रोजी प्रविणला फोन करून मामेबहिणीला त्रास का देतो, अशी विचारणा केली असता, मानोरा येथे मित्रासोबत येऊन दाखवतो, असे उलट उत्तर प्रविणने दिले. फिर्यादीने आतेभाऊ शिवदास (शिवा) उघडे याला घडलेला प्रकार सांगून शिवाजी चौकात बोलावून घेतले.सोबतच मानोरा येथील आतेभाऊ महेश मंदिलकर यालाही मित्रासोबत ये, असे सांगितले. सकाळी ११ वाजताच्या सुमारास शिवदास उघडे हा भुली येथील मित्र राहुल चव्हाण सोबत आला तसेच आतेभाऊ महेश मंदिलकरदेखील मित्र विराज विजय बडवे, सिद्दू संजय ठोंबरे, रवी एकनाथ मंदीलकर, शंकर वासुदेव वायले यांना घेऊन शिवाजी चौकात आले. सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास प्रवीण मळघने, त्याचा भाऊ प्रदीप मळघने, पंजाब झळके, श्रीकांत (बाबड्या) दावने, अविनाश दावणे, अविनाश अगलदरे हे घटनास्थळी आले असता मुलीला त्रास देणे बंद कर, नाहीतर त्याचे परिणाम वाईट होतील असे फिर्यादीकडील मंडळीने प्रविणला म्हटले. यावरून प्रवीण मळघने आणि अविनाश अगलदरे यांनी धारदार चाकू काढून शिवदास उघडे व राहुल चव्हाण यांच्या अंगावर गेले. शाब्दीक वाद भडकताच शिवदास उघडे व राहुल चव्हाण यांच्या पोटावर, छातीवर चाकूने वार केले. प्रवीणसोबत असलेले त्याचे मित्र पंजाब झळके, श्रीकांत (बबड्या) दावने, अविनाश दावणे, प्रदीप मळघणे यांनी फिर्यादी व रवी मंदीलकर यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये शिवदासचा मृत्यू झाला तर राहुल याच्यावर अकोला येथे उपचार सुरू आहेत.

सहा जणांवर गुन्हा दाखल

अनंता कुडवे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी प्रवीण मळघणे, प्रदीप मळघणे,पंजाब झळके,श्रीकांत (बबड्या) दावणे,अविनाश दावणे व गोरेगाव येथील आकाश अगलदरे या सहा आरोपी विरुद्ध कलम ३०२, ३०७, १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ५०६, भा.दं.वी.प्रमाणे गुन्हा दाखल केला. श्रीकांत (बबड्या) दावणे आणि आकाश अगलदरे या दोघांना अटक केली असून, चार जण फरार आहेत. या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कुचेकर करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस