एरियात आला, तर जिवंत सोडणार नाही म्हणत तीक्ष्ण हत्याराने वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 10:25 IST2022-04-13T10:25:32+5:302022-04-13T10:25:59+5:30

Crime News : दिव्यकांत हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल असून, याप्रकरणी सोमवारी रात्री ललित दीक्षित, भोजा व मयूर अशा तिघांविरुद्ध  एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

If he came to the area, he would not leave him alive, Jalgaon | एरियात आला, तर जिवंत सोडणार नाही म्हणत तीक्ष्ण हत्याराने वार

एरियात आला, तर जिवंत सोडणार नाही म्हणत तीक्ष्ण हत्याराने वार

जळगाव : भावाला मारहाण केल्याचा जाब विचारायला गेलेल्या दिव्यकांत विक्की बागडे (वय १७, रा. कंजरवाडा) याच्या मांडीवर तीक्ष्ण हत्याराने हल्ला झाल्याची घटना कासमवाडी भागात घडली आहे. दिव्यकांत हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल असून, याप्रकरणी सोमवारी रात्री ललित दीक्षित, भोजा व मयूर अशा तिघांविरुद्ध  एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

दिव्यकांत याचा लहान भाऊ घनश्याम बागडे हा ललित दीक्षित याच्या गल्लीत गेला असता, त्याचा राग आल्याने ललित याने त्याला मारहाण केली. त्याचा जाब विचारण्यासाठी दिव्यकांत व त्याची आई नीलम बागडे हे रविवारी रात्री १०.३० वाजता गेले होते, तेव्हा ललितने दोघांना शिवीगाळ करून त्याच्याजवळील तीक्ष्ण हत्याराने दिव्यकांत याच्या मांडीवर सपासप वार केले; तर इतर दोघांनी नीलम बागडे यांना मारहाण केली.

यापुढे आमच्या एरियात आला तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकीही त्यांनी दिली. याप्रकरणी सोमवारी रात्री दिव्यकांत याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन तिघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. तपास हवालदार सुनील सोनार करीत आहेत. 

Web Title: If he came to the area, he would not leave him alive, Jalgaon