चेटकीण असल्याच्या संशयावरून कुणी आजारी पडलं तर करत बेदम मारहाण, आता जिवंत जाळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 13:42 IST2022-02-18T13:42:22+5:302022-02-18T13:42:55+5:30
Burned alive : काही लोकांनी चेटकीण असल्याच्या संशयावरून महिलेला जिवंत जाळले, त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. महिलेच्या मृत्यूनंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण आहे.

चेटकीण असल्याच्या संशयावरून कुणी आजारी पडलं तर करत बेदम मारहाण, आता जिवंत जाळले
बिहारमधील नवादा येथून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. काही लोकांनी चेटकीण असल्याच्या संशयावरून महिलेला जिवंत जाळले, त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. महिलेच्या मृत्यूनंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना नवादा येथील बंडखोर राजौली येथील आहे, जिथे महिलेला चेटकीण म्हणत तिचा सतत छळ केला जात होता. गावात कुणी आजारी पडलं तर महिलेला बेदम मारहाण केली जायची.
गुरुवारी काही लोकांनी सर्व मर्यादा ओलांडत महिलेवर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळले. या घटनेनंतर महिलेने कसा तरी जीव वाचवण्यासाठी जवळच्या तलावात उडी मारली, मात्र तिचा जीव वाचू शकला नाही. मृतदेह बाहेर काढण्यासाठी नातेवाईक तलावात गेले असता लोकांनी त्यांनाही मारहाण केली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण असून पोलीस गावात तळ ठोकून आहेत. मृत महिलेची बहीण आणि भावजय यांनी राजौली पोलीस ठाणे गाठून पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. ही घटना गुरुवारी दुपारी घडली.
रिपोर्टनुसार, गावात कोणी आजारी पडल्यानंतर महिलेवर अत्याचार करण्यात आला. जेव्हा कधी कोणाची तब्येत बिघडायची तेव्हा लोक त्या मृत महिलेला त्रास देत असत. घटनेची संवेदनशीलता पाहून पोलीसही आता कारवाई करत आहेत आणि संपूर्ण पोलीस फौजफाट्यासह जंगलाच्या मध्यभागी वसलेल्या गावात पोहोचले.