शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
3
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
4
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
5
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
6
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
7
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
8
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
9
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
10
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
11
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
12
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
13
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
14
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
15
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
16
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
17
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
18
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
19
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
20
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
Daily Top 2Weekly Top 5

'जो नुपूरचा शिरच्छेद करेल, त्याला मी माझे घर देईन', अजमेर दर्ग्याच्या खादिमाचा चिथावणीखोर व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 14:14 IST

Ajmer dargah khadim salman chishti viral video : या व्हिडिओमध्ये खादिम सलमान चिश्ती भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्यासाठी कठोर शब्दांत टिप्पणी करताना दिसत आहेत.

राजस्थान : टेलर कन्हैया लाल आणि उमेश कोल्हे यांच्या हत्येचे प्रकरण थंडावले नाही तोच अजमेर येथून आणखी एक वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ दर्ग्याचे खादिम सलमान चिश्ती याचा आहे. या व्हिडिओमध्ये खादिम सलमान चिश्ती भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्यासाठी कठोर शब्दांत टिप्पणी करताना दिसत आहेत.सलमान चिश्ती दर्गा पोलिस स्टेशनचे एक हिस्ट्रीशीटर देखील आहे, जो नुपूर शर्माचा शिरच्छेद करणाऱ्यांना आपले घर देण्याचे आवाहन देत आहे. खरे तर उदयपूरमधील कन्हैया लाल हत्याकांडानंतर धर्माच्या नावाखाली देशातील वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे ताजे प्रकरण अजमेरचे आहे. खादिम सलमान चिश्ती याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.हा व्हिडिओ कन्हैया लालच्या हत्येपूर्वी त्याचे मारेकरी रियाझ मोहम्मद आणि गौस मोहम्मद यांनी तयार केलेल्या व्हिडिओप्रमाणेच आहे. सुमारे दोन मिनिटे पन्नास सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये सलमान चिश्ती नुपूर शर्माला धार्मिक भावना दुखावत जीवे मारण्याची उघडपणे धमकी देत ​​आहे.व्हिडीओमध्ये सलमान चिश्ती म्हणतोय, 'वेळ पूर्वीसारखी नाहीय, नाहीतर तो बोलला नसता, मला जन्म देणार्‍या माझ्या आईची शपथ आहे, मी तिला जाहीरपणे गोळ्या घातल्या असत्या, मी माझ्या मुलांची शपथ घेतो, तिला मी गोळी घातली असती. आणि आजही मी छाती ठोकून सांगतो, जो कोणी नुपूर शर्माची शिर आणेल, त्याला मी माझे घर देऊन निघून जाईन, ये वचन आहे सलमान.खादिम सलमान चिश्तीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अजमेर शहरातील अलवर गेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजमेरचे एएसपी विकास सांगवान यांनी सांगितले की, या व्हिडिओबाबत पोलिस प्रशासनाची भूमिका अत्यंत कडक आहे, व्हिडिओमध्ये सलमान चिश्ती मद्यधुंद अवस्थेत दिसत आहे, त्याचा शोध सुरू आहे.यापूर्वी नुपूर शर्माच्या विधानाचे समर्थन करणाऱ्या मुलाच्या टेलर वडिलांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. टेलर कन्हैया लालची हत्या करणारे आरोपी रियाझ आणि गौस मोहम्मद यांनी हत्येनंतरही व्हिडिओ बनवून धमकी दिली होती. या निर्घृण हत्येनंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे.अजमेर दर्गा दिवाण जैनुल आबेदीन अली खान यांनी टेलर कन्हैया लालच्या हत्येनंतर सांगितले की, भारतातील मुस्लिम देशातील तालिबानी मानसिकता कधीही स्वीकारणार नाहीत, कोणताही धर्म मानवतेच्या विरोधात हिंसाचाराला प्रोत्साहन देत नाही, विशेषत: इस्लाम. सर्व शिकवणी शांततेचे स्त्रोत म्हणून कार्य करतात.

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRajasthanराजस्थानMuslimमुस्लीम