I got a call from my father so I survived and found a fourth young man | मला वडिलांचा फोन आला म्हणून मी वाचलो अन् चौथा तरुण सापडला 

मला वडिलांचा फोन आला म्हणून मी वाचलो अन् चौथा तरुण सापडला 

ठळक मुद्देतपासाअंती घटनास्थळाहून पळालेल्या सचिन कनकोसेला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली आणि सत्य समोर आले.

खर्डी जवळील चांदा गावातील मामाभाचे व शहापुर येथील एका विवाहित तरुनां चा एका झाडाला  साडीने बांधून गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळले होते. ही आत्महत्या कि हत्या याबाबत शहापूर तालुक्यात विविध चर्चाना उधाण आले असल्याने या दुर्दैवी घटनेबाबत शहापूर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून गळफास लावण्यासाठी वापरलेल्या साडीपासून ते तिघांच्या मोबाईलच्या कॉल डिटेल्सपर्यंत अतिशय गोपनीय पद्दतीने  तपास सुरु ठेवून तपासाअंती घटनास्थळाहून पळालेल्या सचिन कनकोसेला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली आणि सत्य समोर आले.


विद्या शिकण्यासाठी 14 नोव्हेंबर 20 च्या रात्री एका निरव शांतता असलेल्या ठिकाणी जाण्याचे नियोजन नितीन महाराज भेरे यांनी केले होते त्या साठी चांदा येथील ठिकाण निश्चित करण्यात आले नितीन भेरे यांनी मुकेश घावट, महेंद्र दुभेले, सचिन कनकोसे यांना सोबत घेत जंगलाची वाट धरली व इच्छित स्थळी पोहचले. या नंतर सर्वच उलट झाले. जणू  मंत्र, तंत्रची विद्या अयशस्वी ठरली आणि  भेरे महाराजाचा भ्रमनिराश  झाला. नितीन भेरे यांनी मोक्ष प्राप्तीसाठी आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केले. त्यानुसार ४ फास तयार करण्यात आले नितीन भेरे यांनी आणलेल्या साडीचा फास तयार करून झाडावर चढून फास घेण्यासाठी सुरुवात झाली व त्याच दरम्यान सचिन कनकोसेला घरून फोन येण्यात सुरुवात झाली. पहिले 4/5 फोन सचिनने उचलले नाही. मात्र, नंतरचा  फोन त्याने रिसिव्ह केला. फोनवरील संभाषण सुरु असतानाच सचिनने झाडावरून उडी घेतली व घटनास्थळाहून पळ काढला तो थेट कुंडन (शिरोळ ) येथील घरी पोहचला. तोपर्यंत 3 जणांनी फास घेतला होता. मला फोन आला म्हणून मी वाचलो अशी प्रतिक्रिया देताना सचिन ने सर्व माहिती पोलीस प्रशासनास दिली. या प्रकरणी शहापूर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून मयत  बाबा नितीन भेरे व त्यांना मदत करून पोलिसांपासून माहिती लपविल्या प्रकरणी भादंवि कलम 306,व 202 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक स्मिता पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली  शहापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी घनश्याम आढाव व टीम पुढील तपास करीत आहेत.

 

नातेवाईकांनी  दिलेल्या तक्रारी नुसार सचिन कनकोसे याला अटक करून त्याच्या कडून प्राप्त माहिती नुसार 3 जणांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले त्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सचिन कनकोसे याला अटक करून न्यायालयात उभे केले असून न्याय देवते कडून  त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.या गुन्ह्यात मयत तरुणाच्या  नातेवाईकांना न्याय देण्यासाठी यंत्रणा मेहनत घेत  आहे. दरम्यान या प्रकरणी पुढील  तपास सुरु आहे. - नवनाथ ढवळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, शहापूर

 तपासकामी सर्वं पोलीस यंत्रणा ची मेहनत...
दरम्यान तिहेरी आत्महत्या प्रकरणी शहापूर उपविभागीय पोलीस अधीक्षक क्षेत्रातील सर्वच पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी विशेष मेहनत घेत होते.

Web Title: I got a call from my father so I survived and found a fourth young man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.