'मला गर्लफ्रेंड नाही, तू शोधून दे, नाही तर तू बन'; अल्पवयीन मुलीकडे अजब मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 08:01 IST2022-12-12T08:00:45+5:302022-12-12T08:01:01+5:30

पीडित मुलगी आणि तरुण पाटण तालुक्यातील एकाच गावात वास्तव्यास आहेत. त्यामुळे दोघांची तोंडओळख आहे. यातून संबंधित मुलाने सोशल मीडियावरून त्या मुलीकडे अजब मागणी केली.

'I don't have a girlfriend, you find one, or you become one'; A strange demand for a minor girl in Satara | 'मला गर्लफ्रेंड नाही, तू शोधून दे, नाही तर तू बन'; अल्पवयीन मुलीकडे अजब मागणी

'मला गर्लफ्रेंड नाही, तू शोधून दे, नाही तर तू बन'; अल्पवयीन मुलीकडे अजब मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क 
सातारा: अलीकडे मुलींच्या छेडछाडीचे प्रकार वाढले असून, अशाच एका छेडछाडीच्या प्रकाराने पोलिसांच्याही भुवया उंचावल्या आहेत. 'मला गर्लफ्रेंड नाही, तू शोधून दे, नाही तर तू बन,' अशी अजब मागणी एका तरुणाने अल्पवयीन मुलीकडे केली आहे. या प्रकारानंतर भयभीत झालेल्या मुलीने ढेबेवाडी, ता. पाटण पोलिस ठाण्यात धाव घेऊन संबंधित तरुणाविरोधात तक्रार दिली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित मुलगी आणि तरुण पाटण तालुक्यातील एकाच गावात वास्तव्यास आहेत.
त्यामुळे दोघांची तोंडओळख आहे. यातून संबंधित मुलाने सोशल मीडियावरून त्या मुलीकडे अजब मागणी केली. 'मला गर्लफ्रेंड नाही, मला शोधून दे, नाही तर तू बन, तुझे काही डिटेल्स माझ्याकडे आहेत, तुझा फोन हॅक करायला सांगितला आहे,' अशी धमकी देऊन पीडित मुलीला त्याने ब्लॅकमेल केले.

या प्रकारानंतर भयभीत झालेल्या अल्पवयीन मुलीने हा प्रकार तिच्या घरच्यांना सांगितला. त्यानंतर घरच्यांनी मुलीला घेऊन थेट ढेबेवाडी पोलिस ठाणे गाठले. मुलीच्या तक्रारीवरून संबंधित तरुणावर विनयभंगासह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Web Title: 'I don't have a girlfriend, you find one, or you become one'; A strange demand for a minor girl in Satara