Hyderabad vet doctor gangrape murder accused served mutton curry | संतापजनक! हैदराबाद बलात्कार आणि हत्येप्रकरणातील आरोपींना तुरुंगात मटण करी

संतापजनक! हैदराबाद बलात्कार आणि हत्येप्रकरणातील आरोपींना तुरुंगात मटण करी

ठळक मुद्देचारही आरोपींना हैदराबादच्या चेरापल्ली येथील हाय सिक्युरिटी तुरुंगात ठेवण्यात आले आहे.या चारही आरोपींची पहिली रात्र तुरुंगात झोपेविनाच गेली असल्याची माहिती मिळत असून या चौघांवरही पोलिसांची तुरुंगात करडी नजर आहे. 

हैदराबाद - देशात खळबळ माजवणारी हैदराबाद येथील बलात्कार आणि हत्या प्रकरणामुले संपूर्ण देशातून संताप व्यक्त होत आहे. त्यातच या प्रकरणातील आरोपींना तुरुंगात मात्र खाण्यासाठी मटन करी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या आरोपींना मटण करी देण्याची गरज काय होती? असा प्रश्न संतप्त लोकांकडून विचारला जात आहे.

हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींना हैदराबादच्या चेरापल्ली येथील हाय सिक्युरिटी तुरुंगात ठेवण्यात आले आहे. या चारही आरोपींना दुपारच्या जेवणात डाळ-भात देण्यात आला. तर रात्रीच्यावेळी त्यांना मटण करी आणि भात देण्यात आला. या चारही आरोपींची पहिली रात्र तुरुंगात झोपेविनाच गेली असल्याची माहिती मिळत असून या चौघांवरही पोलिसांची तुरुंगात करडी नजर आहे. 

Web Title: Hyderabad vet doctor gangrape murder accused served mutton curry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.