शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

सॉफ्टवेअर इंजिनिअर झाला चोर, २६ घरांत दरोडा; घेतली BMW, १ किलो सोनं, ६ किलो चांदीवर डल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 11:48 IST

हैदराबादमधील एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करणाऱ्या २७ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरला विशाखापट्टणम पोलिसांनी अटक केली आहे.

हैदराबादमधील एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करणाऱ्या २७ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरला विशाखापट्टणम पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण आतापर्यंत किमान २६ घरफोडीच्या घटनांमध्ये सहभागी आहे. आरोपीला महागड्या आणि आलिशान जीवनशैलीची आवड होती, परंतु  नोकरीतून मिळणारा पगार यासाठी पुरेसा नव्हता. याच कारणामुळे त्याने चोरीचा मार्ग पत्करला.

'इंडियन एक्सप्रेस'च्या रिपोर्टनुसार, विशाखापट्टणमचे पोलीस आयुक्त शंकरब्रत बागची यांनी सांगितलं की, आरोपी बंद घरांना लक्ष्य करायचा. तो घरात शिरून पैसे, सोन्याचे आणि चांदीचे दागिने चोरत असे. चोरीच्या पैशातून त्याने चक्क एक महागडी BMW कारही खरेदी केली होती. आरोपीविरुद्ध विशाखापट्टणमच्या विविध भागात चोरीचे २६ गुन्हे दाखल आहेत.

या चोऱ्यांमध्ये १ किलोपेक्षा जास्त सोनं, ६ किलो चांदी आणि ४० हजार ५०० रुपये रोख चोरीला गेले होते. आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून ६९९ ग्रॅम सोन्याचे दागिने, ३.८ किलो चांदीचे दागिने आणि BMW कार जप्त केली आहे. आरोपीने चोरीच्या पैशातून परदेश दौरेही केल्याचा पोलिसांना संशय आहे.

पोलिसांनी सांगितलं की, आरोपी चोरी करण्यापूर्वी आपल्या BMW कारमधून फिरून अशा घरांची रेकी करायचा ज्यांचे मालक बाहेर गावी गेले आहेत. तो हातोडा, कटर आणि स्क्रू ड्रायव्हर सारख्या साध्या साधनांनी कुलूप तोडायचा. आपली ओळख लपवण्यासाठी तो नेहमी मास्क आणि टोपी घालत असे. आरोपीची आणखी एक चलाखी म्हणजे तो एकाच परिसरात वारंवार चोरी करत नसे.

पोलिसांना संशय येऊ नये म्हणून तो लांबच्या परिसरात जाऊन घरं फोडायचा. तपासात असंही समोर आलं आहे की, आरोपीचा गुन्हेगारी रेकॉर्ड जुना आहे. अल्पवयीन असताना त्याला चार घरांत चोरी केल्याप्रकरणी पकडण्यात आलं होतं आणि काही काळ बालसुधारगृहात पाठवण्यात आलं. त्यानंतर आपल्या मूळ जिल्ह्यात म्हणजेच काकीनाडा येथे अनेक चोऱ्यांच्या प्रकरणात त्याने १४ महिने तुरुंगवासही भोगला आहे. आतापर्यंत एकूण ६२ चोरीच्या घटनांमध्ये त्याचा सहभाग असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Software engineer turns thief, loots 26 homes, steals BMW, gold.

Web Summary : A software engineer in Hyderabad was arrested for 26 burglaries, driven by a desire for a lavish lifestyle his salary couldn't afford. He stole gold, silver, cash, and even bought a BMW with the loot. Police recovered stolen goods and suspect foreign trips.
टॅग्स :theftचोरीThiefचोरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटक