शहरं
Join us  
Trending Stories
1
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
2
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
3
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
4
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
5
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
6
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
7
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
8
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
9
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
10
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
11
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
12
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
13
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
14
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
15
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
16
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
17
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
18
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
19
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
20
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  

Hyderabad Honor Killing: ‘माझ्यावरील प्रेमासाठी तो मुस्लिम बनण्यास तयार होता, पण…’, आशरिनला शोक अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 10:52 IST

Hyderabad Honor Killing: आशरिन आणि नागराजू यांच्या प्रेमकहाणीच्या झालेल्या या करुण अंताने देशभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, आता आशरिन सुल्ताना हिने तिच्या प्रेमकहाणीचा हृदयद्रावक अनुभव कथन केला आहे. 

हैदराबाद - हैदराबादमध्ये गुरुवारी घडलेल्या हॉरर किलिंगच्या घटनेने खळबळ उडाली आहे. एका मुस्लिम तरुणीने दलित तरुणाशी केलेलं लग्न या तरुणीच्या कुटुंबीयांना अजिबात आवडलं नाही. त्यामुळे त्यांनी या तरुणाची भररस्त्यात बेदम मारहाण करतू हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे त्यावेळी रस्त्यावर असलेल्या लोकांपैकी कुणीही तिला वाचवायला आला नाही. आशरिन आणि नागराजू यांच्या प्रेमकहाणीच्या झालेल्या या करुण अंताने देशभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, आता आशरिन सुल्ताना हिने तिच्या प्रेमकहाणीचा हृदयद्रावक अनुभव कथन केला आहे. 

२५ वर्षांचा नागराजू आणि २३ वर्षांची आशरीन सुल्ताना यांनी दोन महिन्यांआधी लग्न केलं होतं. दोघेही एकमेकांना बऱ्याच आधीपासून ओखळायचे. त्यांनी एकत्र राहण्याची शपथ घेतली होती. मात्र गुरुवारी ही शपथ तुटली. आशरीनच्या भावांनी नागराजूची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. नागराजूचं आशरीनवर खूप प्रेम होतं. ते प्रेम धर्म आणि जातीपातीच्या वर होतं.

आशरिननं सांगितलं की, मी आणि नागराजूने कुटुंबीयांना खूप विनंती केली. नागराजू मुस्लिम बनण्यासही तयार होता.  त्याने कुटुंबीयांना सांगितले होते की, तो आशरीनसोबत लग्न करण्यासाठी इस्लाम कबूल करण्यास तयार आहे. मात्र माझ्या आईने त्याचं म्हणणं ऐकलं नाही. त्यानंतर आम्ही कुटुंबीयांच्या इच्छेविरुद्ध जाऊन लग्न केलं. 

त्यानंतर आशरिनच्या कुटुंबीयांनी बदला घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्याचा शेवट अखेर नागराजूच्या मृत्यूने झाला. गुरुवारी हे दोघेही सिग्नलवर उभे होते. तेव्हा आशरिनच्या भावासह पाच जण तिथे आले. त्यांनी लोखंडी रॉडने नागराजू याला मारहाण करण्यास सुरुवात केली. आसरिनने मदतीसाठी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. ती लोकांच्या मदतीसाठी हातापाया पडू लागली. पण कुणीही तिच्या मदतीसाठी आले नाहीत. नागराजूची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली.  

टॅग्स :Honor Killingऑनर किलिंगLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टCrime Newsगुन्हेगारीTelanganaतेलंगणा