चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची गळा आवळून केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 18:32 IST2018-11-01T15:20:47+5:302018-11-01T18:32:14+5:30

याप्रकरणी भांडुप पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपी पती स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन त्याने खुनाची कबुली दिली आहे. 

Husband's wife was thrown out of the victim's character by murder | चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची गळा आवळून केली हत्या

चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची गळा आवळून केली हत्या

मुंबई - भांडूप येथील हनुमान नगरमध्ये चारित्र्यावर संशय घेत २२ वर्षीय पतीने १९ वर्षीय पत्नीची हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. आरोपी पतीचे नावं अमर मयूरे असं असून मृत पत्नीचे नाव शिवानी मयूरे आहे. याप्रकरणी भांडुप पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपी पती स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन त्याने खुनाची कबुली दिली आहे. 

शिवानीला वारंवार एका अज्ञात मोबाईल क्रमांकावरून फोन येत असे. काल सकाळी ८. ३० वाजताच्या सुमारास असाच फोन शिवानीला आला. त्यानंतर अमर तिला कोणाचा फोन आला विचारलं असता तिने मैत्रिणीचा फोन असल्याचं सांगितलं. मात्र, ती मित्राशी बोलत असल्याचं उघड झाल्यानंतर चिडलेल्या अमरने कपडे वाळत घालण्याची दोरीने गळा आवळा. गळा आवळल्याने शिवनी जागीच मरण पावली. त्यानंतर घरात मयत पत्नीला ठेवून, घराला टाळ लावून काल संपूर्ण दिवसभर अमर कांजूरमार्ग परिसर फिरत होता. शेवटी त्याने काल रात्री १०.३० वाजताच्या सुमारास विक्रोळीतील पार्क साईट पोलीस ठाण्यात जाऊन केलेल्या हत्येची कबुली दिली. त्यानंतर पार्कसाईट पोलिसांनी अमरला भांडुप पोलिसांच्या हवाली केले. भांडुप पोलिसांनी घरातील शिवनीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. 

Web Title: Husband's wife was thrown out of the victim's character by murder