खळबळजनक! पत्नीच्या छेडछेडीवरून झालेल्या भांडणात पतीची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 21:04 IST2019-04-29T21:02:14+5:302019-04-29T21:04:41+5:30
याप्रकरणी वडाळा टी. टी. पोलिसांनी इरफान ख्वाजा मोमीन (२२) याला अटक केली आहे.

खळबळजनक! पत्नीच्या छेडछेडीवरून झालेल्या भांडणात पतीची हत्या
मुंबई - पत्नीची छेड काढत तिच्यावर वाईट नजर ठेवणाऱ्या मित्राने मित्राची काल रात्री ११.३० वाजताच्या सुमारास हत्या वडाळा येथे पांडीयान गल्लीत केल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी वडाळा टी. टी. पोलिसांनी इरफान ख्वाजा मोमीन (२२) याला अटक केली आहे. याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
यामध्ये इब्राहीम अन्सारी (२४) याचा मृत्यू झाला. इरफान आणि इब्राहीम हे दोघे मित्र होते. मात्र इरफानची इब्राहीमच्या पत्नीवर वाईट नजर होती. गेल्या तीन वर्षांपासून इरफान इब्राहिमच्या पत्नीची वारंवार छेड काढत असल्याची तक्रार पत्नीने इब्राहीमला केली होती. यामुळे इरफान आणि इब्राहीम यांच्यात सातत्याने वाद सुरु होते. मात्र, काल रात्री भांडण विकोपाला गेलं आणि इरफानने इब्राहिमचा हत्या केली. अशातच इरफानने रविवारी इब्राहीमला गुलशान-ए-मदरसा येथे बोलावुन वाद घालण्यास सुरुवात केली. या वादातून त्याने इब्राहीमला चाकुने भोसकुन हत्या केली. त्यानंतर त्याने पळ काढला. मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीने इरफानला अटक करीत याचा अधिक तपास करण्यास सुरुवात केली आहे.