पती बेडवर डाराडूर झोपलेला; पत्नीने कढईतले उकळते तेल फेकले, सासरा पुरता हादरला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2022 21:27 IST2022-09-18T21:27:21+5:302022-09-18T21:27:47+5:30
बिसौरी गावातील ही घटना आहे. मंजीत सिंह या तरुणाचे गेल्याच वर्षी लग्न झाले होते. गाझीपूरची पत्नी होती.

पती बेडवर डाराडूर झोपलेला; पत्नीने कढईतले उकळते तेल फेकले, सासरा पुरता हादरला
उत्तर प्रदेश हे राज्य अवघ्या देशातील गुन्ह्यांची राजधानी बनले आहे. कोणत्या प्रकारचे गुन्हे होत नाही, असे नाही. आताच एक गुन्हा समोर आला आहे. चंदौली जिल्ह्यात विचारही करवणार नाही असा प्रकार घडला आहे.
रविवारी सुट्टी असल्याने पती डाराडून झोपला होता. दिवसाढवळ्याच त्याच्या पत्नीने त्याच्या तोंडावर उकळते तेल फेकल्याचा प्रकार घडला आहे. एकत्र कुटुंबात राहत असल्याने वेदनेने किंचाळणाऱ्या पतीला कुटुंबीयांनी तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. या तरुणाची प्रकृती गंभीर आसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. या साऱ्या प्रकारात महिलेचा सासरा पुरता हादरलेला आहे. महेंद्र सिंह यांनी सुनेविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.
बिसौरी गावातील ही घटना आहे. मंजीत सिंह या तरुणाचे गेल्याच वर्षी लग्न झाले होते. गाझीपूरची पत्नी होती. रविवारी सुनेने सासऱ्याला चिप्स तळण्यासाठी तेल हवे असल्याचे सांगितले. सासऱ्याने किराणा दुकानातून सुनेला तेल आणून दिले. ते तेल तिने गॅसवरील कढईत उकळविले. इथपर्यंत सारे नीट चालले होते. परंतू, अचानक आतून मुलाचा मोठमोठ्याने ओरडण्याचा आवाज आला आणि सासू सासरे सारे त्याच्या बेडरुमकडे धावले. पाहतात तर सुनेच्या हातात रिकामी कढई होती. मुलगा तेलात होरपळला होता. सुनेने ते उकळते तेल झोपलेल्या पतीच्या अंगावर ओतले होते.
तरुणाच्या वडिलांनी सांगितले की, मनजीतचा चेहरा आणि शरीर गरम तेलाने भाजले होते. गंभीररित्या जळालेल्या मनजीतला आम्ही जिल्हा रुग्णालयाच्या बर्न युनिटमध्ये दाखल केले आहे. जिथे त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. याआधीही सुनेने दोनदा मुलाला मारण्याचा प्रयत्न केला आहे.