पतीनेच नग्न छायाचित्र व्हायरल करण्याची दिली धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 17:18 IST2018-09-16T16:47:42+5:302018-09-16T17:18:01+5:30
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत शारिरीक, माानसिक छळ केल्याप्रकरणी विवाहिनेचे पतीविराेधात गुन्हा दाखल केला अाहे.

पतीनेच नग्न छायाचित्र व्हायरल करण्याची दिली धमकी
पिंपरी : गोवा येथे नेऊन तेथे हॉटेलात अनैसर्गिक कृत्य करीत, जबरदस्तीने मोबाईलवर काढलेली छायाचित्र सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार पतीनेच पत्नीला ब्लॅकमेल केल्याची धक्कादायक घटना समाेर अाली अाहे. चारित्र्यावर संशय घेत शरिरीक, मानसिक छळ केल्याप्रकरणी विवाहितेने पतीविरोधात भोसरी एमआयडीसी पोलिसांकडे गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पती अाणि अन्य दोघांच्या विरोधात विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सासऱ्यांनी माहेरहून मोटार खरेदीसाठी पैसे आणावेत, असा तगादा लावला. ननंद हिने हाताने मारहाण करीत शिवीगाळ केली. तिघांविरोधात विवाहितेने पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. पतीने गोव्यात नेऊन अत्यंत वाईट कृत्य केले. तसेच मित्राबरोबर संबंध आहेत असे म्हणत चारित्र्यावर संशय घेतला. पती, ननंद आणि सासरे यांच्याकडून त्रास होत आहे. पतीने माझा मोबाईल घेऊन मित्राच्या मदतीने त्या मोबाईलमध्ये छायाचित्र अपलोड केली. पती वारंवार ब्लॅकमेल करीत असल्याने त्रस्त झालेल्या विवाहितेने भोसरी एमआयडीसी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.