पत्नीशी झाला वाद, पतीने प्रायव्हेट फोटो केले शेअर अन् लिहिले, 'पूर्ण झाला बदला', नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 19:34 IST2023-03-28T19:34:36+5:302023-03-28T19:34:59+5:30

भांडण एवढे टोकाला गेले की पतीने पत्नीचे प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

husband shared his private photos of his wife after fight betwenn them in kanyakumari | पत्नीशी झाला वाद, पतीने प्रायव्हेट फोटो केले शेअर अन् लिहिले, 'पूर्ण झाला बदला', नेमकं प्रकरण काय?

पत्नीशी झाला वाद, पतीने प्रायव्हेट फोटो केले शेअर अन् लिहिले, 'पूर्ण झाला बदला', नेमकं प्रकरण काय?

आपल्याकडे पती-पत्नीची भांडण होणं हे रोजचेच आहे, सहज काहीना काही कारणासाठी मोठा वाद होत असतो. पण, पुन्हा काही वेळाने ती भांडण मिटतात. सध्या एका कपलच भंडण चर्चेत आले आहे. हे भांडण एवढे टोकाला गेले की पतीने पत्नीचे प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

ही घटना कन्याकुमारीची आहे. हे प्रकरण मट्टम जिल्ह्यातील एका कपलशी संबंधित आहे. येथे एका ३२ वर्षीय तरुणीचा विवाह ४० वर्षीय व्यक्तीसोबत झाला होता. १० वर्षे एकत्र राहिल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि दोघांचा घटस्फोट झाला. या दोघांना एक नऊ वर्षांची मुलगी आहे, जी अजूनही आईसोबत राहते. 

वेगळे राहूनही दोघांमध्ये वाद व्हायचे. कधी कधी पती काहीतरी बोलायचा तर पत्नीचीही काहीतरी बोलायची यानंतर दोघांच्यात वाद व्हायचा. दरम्यान असाच एक दिवस वाद झाला, यात पतीला राग आला आणि त्याने त्याच्या फोनमध्ये असलेले पत्नीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केला. हा प्रकार पत्नीला समजल्यावर पत्नीने पोलीस ठाणे गाठले. 

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडितेने दिला मुलीला जन्म

लीक केलेल्या फोटो आणि व्हिडीओमध्ये पती स्वत:ही दिसत आहे. फोटो आणि व्हिडीओ पाहताच ते व्हायरल झाले. अखेर पत्नीने पोलिसात तक्रार केली आणि पोलिसांनी आरोपीला अटक केली. सध्या त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: husband shared his private photos of his wife after fight betwenn them in kanyakumari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.