husband said to women helpline wife beaten to me lot i am talking anywhere but she know in patna | "माझी बायको मला खूप मारते, संशय घेते, आता मी वैतागलोय", पत्नी पीडित नवऱ्याने मांडली व्यथा 

"माझी बायको मला खूप मारते, संशय घेते, आता मी वैतागलोय", पत्नी पीडित नवऱ्याने मांडली व्यथा 

नवी दिल्ली - पती-पत्नीमध्ये काही कौटुंबिक कारणांवरून वाद झाल्याच्या घटना या समोर येत असतात. पण त्यातील काही भांडणं ही काही वेळेस विकोपाला ही जातात. अनेकदा काही प्रकरणांमध्ये महिलांना त्रास दिला जातो. महिलांचा होणार छळ रोखण्यासाठी, महिलांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी महिला हेल्पलाईनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र आता या महिला हेल्पलाईनवर पीडित पुरुषांच्याही तक्रारी येऊ लागल्या आहेत. बिहारच्या पाटणामध्ये अशीच एक घटना घडली आहे. पत्नीच्या त्रासाला वैतागलेल्या नवऱ्याने महिला हेल्पलाईनकडे धाव घेतली आहे.

एका पुरुषाने आपल्या पत्नीविरोधात तक्रार केली आहेत. महिला हेल्पलाईनकडे आपली व्यथा मांडली. मी माझ्या पत्नीला वैतागलो आहे. ती मला मारते. संशय घेते. काय करू काहीच समजत नाही असं म्हणत त्याने महिला हेल्पलाइनकडे दाद मागितली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, "माझी बायको मला खूप मारते. तिच्या मनासारखं काही झालं नाही तर ती वाटेल ते करते. छोट्या छोट्या कारणावरून संशय घेते. दिवसभर माझ्यावर नजर ठेवते. तिच्या शिकवण्यानुसार मुलंही माझ्यावर लक्ष ठेवून असतात. आता तर तिने मोबाईलही हॅक केला आहे. त्यामुळे मी कोणाशी बोलतो हे तिला माहिती होतं" असं पतीने म्हटलं आहे. 

"फोन केला तरी बिझी येतो. त्यामुळे मी माझ्या पतीला वैतागले आहे"

महिला हेल्पलाईनने पतीची व्यथा ऐकून घेतल्यानंतर त्याच्या पत्नीचीही बाजू ऐकली. पत्नीने "माझा नवरा रिअल इस्टेटचं काम करतो. त्याचे अनेक महिलांसोबत संबंध आहेत. गेल्या कित्येक महिन्यांपासून तो माझ्याकडे लक्ष देत नाही. फोन केला तरी बिझी येतो. त्यामुळे मी माझ्या पतीला वैतागले आहे" असं म्हटलं आहे. दोघांचंही म्हणणं ऐकून घेतल्यानंतर हेल्पलाईनच्या अधिकाऱ्यांनी नवरा-बायकोला दहा दिवसांची वेळ दिली आहे. या कालावधीत त्यांनी त्यांना असलेल्या समस्यांवर तोडगा काढावा असं म्हटलं आहे.

काहीतरी मार्ग काढावा असं सांगितलं आहे. मात्र तरी देखील त्यांच्यातील वाद मिटले नाहीत आणि असंच कायम राहिलं तर मग महिला हेल्पलाईन पुढील कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. राजस्थानच्या चुरूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाचं अमिष दाखवून तरुणीवर तब्बल पाच वर्षे बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नात्याला काळीमा फासणारी घटना रतननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली आहे.

नात्याला काळीमा! लग्नाचं आमिष दाखवून अपहरण, 5 वर्षे केला बलात्कार: तरुणीने सांगितला धक्कादायक प्रकार

लग्नाच्या आमिष दाखवत आरोपीने आणि त्याच्या मित्रांनीही तरुणीवर पाच वर्षे बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तरुणीने या प्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2016 मध्ये 22 वर्षीय तरुणीचे तिचा जवळचा नातेवाईक असलेल्या ओम प्रकाश याने लग्नाचं आमिष दाखवून अपहरण केलं होतं. तिला त्याने जयपूरला नेले. तेथील एका खोलीत तिच्यावर बलात्कार केला. आरोपीच्या मित्रानेही तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. काही महिन्यांनी तरुणी गरोदर राहिली. आरोपीने तिला धमकावून गर्भपात करून घेतला. तक्रारीनुसार, ओम प्रकाशच्या भूलथापांना बळी पडलेली तरूणी तीन वेळा गरोदर राहिली. मात्र, तिन्ही वेळेला गर्भपात करून घेतला. आरोपी ओम प्रकाश काही दिवसांनी पसार झाला. 

Web Title: husband said to women helpline wife beaten to me lot i am talking anywhere but she know in patna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.