शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
7
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
8
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
9
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
10
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
11
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
12
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
13
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
14
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
16
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
17
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
18
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
19
विना नंबरप्लेटच्या भरधाव पोर्शे गाडीने तरुण तरुणीला उडवले; दोघांचा जागीच मृत्यू, पुण्यातील घटना
20
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती

पत्नीला पळवून नेल्यामुळे पतीने काढला प्रियकाराचा काटा; 'त्या' खुनाचा अखेर उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2020 5:42 PM

गंगापूर धरणालगत आढळला होता मृतदेह

नाशिक: आभाळवाडी परिसरातील एका विवाहितेसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित करुन दोन महिन्यांपूर्वी विवाहितेला पळवून घेऊन गेल्याचा राग मनात धरत विवाहितेच्या पतीने प्रियकराचा निर्घृणपणे खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

दोन दिवसांपूर्वी गंगापूर धरणाच्या परिसरात आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटवून तालुका पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खुनाचा गुन्हा उघडकीस आणला. याबाबत अधिक माहिती अशी, हरसूल येथे राहणारा नितीन टबाले याचा सावरगाव शिवारात गंगापूर धरणाच्या परिसरात पाटबंधारे विभागाच्या मालकीच्या जागेत मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाचा पंचनामा केला असता, त्याची बेदम मारहाण करुन हत्या करण्यात आल्याचे समोर आले.

तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.  या गुन्ह्याचा तालुका पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा समांतर तपास करत असताना तालुका पोलीस ठाण्याचे शिपाई विक्रम कडाळे यांना मयत नितीन याचे आभाळवाडीतील एक विवाहित स्त्रीसोबत प्रेमसंबंध असल्याचा धागा मिळाला. त्यावरुन पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरविली असता नितीन हा मागील दोन महिन्यांपासून त्या विवाहितेसोबत राहत होता आणि तिच्या पतीने त्याचा खून केल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या महितीच्याआधारे संशयित अशोक   मोरे (23, रा. आभाळवाडी, उजवा कॅनॉल, महादेवपूर शिवार) यास तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता अशोक याने गुन्हयाची कबुली देत घडलेली हकीगत सांगितली. यानुसार पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कारवाई करत त्यास खुनाच्या गुन्ह्यात बेड्या ठोकल्या. पुढील तपास तालुका पोलिस करत आहेत.

टॅग्स :MurderखूनNashikनाशिकPoliceपोलिस