Husband refuses to give smartphone for daughter's online class; Wife's suicide pda | मुलाच्या ऑनलाईन क्लाससाठी स्मार्टफोन देण्यास पतीचा नकार; पत्नीची आत्महत्या

मुलाच्या ऑनलाईन क्लाससाठी स्मार्टफोन देण्यास पतीचा नकार; पत्नीची आत्महत्या

ठळक मुद्देमैदान गढी परिसरात राहणारी ज्योती मिश्रा (२९) आपल्या मुलाच्या ऑनलाइन क्लाससाठी स्मार्टफोन मिळविण्याचा प्रयत्न करीत होती. महिलेचा भाऊ चंद्र शेखर पांडे, तिचा नवरा आणि शेजारी मुन्ना शर्मा यांचे देखील जबाब नोंदविण्यात आले आहेत. त्याच्या भावाने कोणत्याही प्रकारची शंका व्यक्त केलेली नाही.

दक्षिण दिल्लीतील मैदान गढी भागात स्मार्टफोन खरेदी करण्यास पतीने नकार दिल्याने पत्नीने स्वत: ला पेटवून घेतले. महिलेला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.मात्र, जिथे तिचा मृत्यू झाला. लॉकडाऊनमध्ये पत्नी मुलाच्या ऑनलाइन क्लाससाठी स्मार्टफोनची मागणी करत असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पती-पत्नीमध्ये भांडण झाले. या महिलेचे 7 वर्षांपूर्वी लग्न झाले होते.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मैदान गढी परिसरात राहणारी ज्योती मिश्रा (२९) आपल्या मुलाच्या ऑनलाइन क्लाससाठी स्मार्टफोन मिळविण्याचा प्रयत्न करीत होती. बुधवारी ज्योतीचा नवरा प्रमोद मिश्रा यांनी मोबाईल खरेदीसाठी काही दिवस थांबायला सांगितले. तेव्हा दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर महिलेने स्वत: ला पेटवून घेतले. या घटनेनंतर महिलेला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे तिचा गुरुवारी मृत्यू झाला.

पोलिस उपायुक्त (दक्षिण) अतुलकुमार ठाकूर यांनी सांगितले की, महिला गंभीर स्वरूपात जळाली होती. या महिलेने असा जबाब दिला की, तिचे पतीशी जोरदार वाद आहे, ज्यामुळे तिने हे पाऊल उचलले. पोलिसांना घटनास्थळावरून प्लास्टिकचे कॅन व मॅचस्टीक सापडल्या आहेत. त्याचवेळी महिलेचा भाऊ चंद्र शेखर पांडे, तिचा नवरा आणि शेजारी मुन्ना शर्मा यांचे देखील जबाब नोंदविण्यात आले आहेत. त्याच्या भावाने कोणत्याही प्रकारची शंका व्यक्त केलेली नाही.

 

बनावट ईमेलद्वारे फसवणूक करणाऱ्या त्रिकुटाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

 

बनावट कागदपत्रांद्वारे ई-पास बनवून देणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात

 

धक्कादायक! 943 परदेशी तबलिगी जमातींपैकी 197 जणांचे पासपोर्ट गायब

Web Title: Husband refuses to give smartphone for daughter's online class; Wife's suicide pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.