पत्नीला माहेरी पाठवून दुसऱ्या तरूणीला घेऊन पळाला पती, काही दिवसांपूर्वीच बनला होता पिता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 15:34 IST2022-06-21T15:00:03+5:302022-06-21T15:34:26+5:30

Indore Crime News : पत्नीने पतीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पत्नीचा आरोप आहे की, बऱ्याच महिन्यांपासून पतीचं दुसऱ्या तरूणीसोबत अफेअर सुरू होतं. आता पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Husband ran away with muslim girl in Indore after wife's delivery | पत्नीला माहेरी पाठवून दुसऱ्या तरूणीला घेऊन पळाला पती, काही दिवसांपूर्वीच बनला होता पिता

पत्नीला माहेरी पाठवून दुसऱ्या तरूणीला घेऊन पळाला पती, काही दिवसांपूर्वीच बनला होता पिता

Indore Crime News : मध्य प्रदेशच्या इंदुरमध्ये एका पतीने असा कारनामा केला ज्याबाबत समजल्यावर पत्नी हैराण झाली. छोटा बांगडदा भागात राहणाऱ्या तरूणाचं काही वर्षाआधी लग्न झालं होतं. 15 दिवसांआधी तो पिता बनला होता. त्याने डिलीवरीसाठी पत्नीला माहेरी पाठवलं होतं. यादरम्यान पती दुसऱ्या तरूणीला घेऊन पळाला. पत्नीला फेसबुकच्या माध्यमातून समजलं की, तिच्या पतीने दुसरं लग्न केलं आहे. त्यानंतर पत्नीने पतीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पत्नीचा आरोप आहे की, बऱ्याच महिन्यांपासून पतीचं दुसऱ्या तरूणीसोबत अफेअर सुरू होतं. आता पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बबीता नावाच्या महिलेने तिच्या पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पत्नीने सांगितलं की, पतीने तिची फसवणूक करत दुसऱ्या तरूणीसोबत लग्न केलं. महिलेने दावा केला की, ती तरूणी मुस्लिम आहे. सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून तिला समजलं की, पतीने दुसरं लग्न केलं. तक्रारीनंतर आरोपी पतीने तिला धमकी दिली आहे.

पत्नीने सांगितलं की, काही वर्षापूर्वी राजेश नावाच्या व्यक्तीसोबत तिचं लग्न झालं. 15 दिवसांआधीच तिने एका मुलीला जन्म दिला. बाळाच्या जन्मानंतर पती तिला भेटायलाही आला नाही. इतकंच काय तर तिच्या सासरचे लोकही तिला भेटायला आले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पतीन खजराना भागात राहणाऱ्या तरूणीला आपल्यासोबत घेऊन पळाला. त्यानंतर दोघांनी लग्न केलं. पत्नीने आरोप केला की, पतीची तक्रार तिने सासरच्या लोकांकडेही केली होती. पण सासू-सासऱ्यांनी तिला धमकी दिली आणि गप्प बसण्यास सांगितलं.

पत्नीचा आरोप आहे की, पतीने एका दुसऱ्या नंबरवरून तिला फोन केला होता आणि धमकी दिली. महिलेने दावा केला की, सासू-सासऱ्यांना माहीत आहे की, आरोपी पती कुठे आहे आणि कुणासोबत आहे. पोलीस पुढील चौकशी करत आहेत.

Web Title: Husband ran away with muslim girl in Indore after wife's delivery