पोटात काच घुसवून केला पतीचा खून, पत्नी, मुलीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 01:58 IST2020-08-31T01:57:40+5:302020-08-31T01:58:25+5:30

नालासोपारा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास केल्यावर हे सत्य बाहेर आल्यावर शनिवारी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Husband murdered by inserting glass in stomach, wife, daughter arrested | पोटात काच घुसवून केला पतीचा खून, पत्नी, मुलीला अटक

पोटात काच घुसवून केला पतीचा खून, पत्नी, मुलीला अटक

नालासोपारा : पश्चिमेकडील इमारतीमध्ये राहणाऱ्या एका महिलेने मुलीच्या साहाय्याने फुटलेल्या खिडकीच्या काचेद्वारे पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री घडली आहे. नालासोपारा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास केल्यावर हे सत्य बाहेर आल्यावर शनिवारी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
नालासोपारा पश्चिमेकडील हनुमाननगरमधील विनी रेसिडेन्सी स्पेस-२ या इमारतीमध्ये वाघेला परिवार राहतो. सुरेश जग्या वाघेला (४६) यांचा त्यांची पत्नी जसू (३९) आणि मुलगी मोनिका (२३) या दोघींनी मिळून तुटलेल्या खिडकीची काच पोटात घुसवून बुधवारी रात्री खून केला आहे. चार लाखांच्या चेकवरून आणि पत्नीच्या इतर इसमासोबतच्या अनैतिक संबंधाला विरोध या दोन कारणांवरून हत्या केल्याचे पोलिसांनी ‘लोकमत’ला सांगितले. सुरेश यांच्या नातेवाइकाने तक्रार दिल्यावर शनिवारी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

चार लाखांच्या चेकवरून वाद असल्याने पतीचा पत्नी व मुलीने खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक करून वसई न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
- किशोर माने, सहायक पोलीस निरीक्षक, नालासोपारा पोलीस ठाणे

Web Title: Husband murdered by inserting glass in stomach, wife, daughter arrested