पतीची हत्या केली मग मृतदेहाजवळ रात्रभर बसली, 4 वर्षाआझी केलं होतं लव्ह मॅरेज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 15:55 IST2024-02-07T15:54:56+5:302024-02-07T15:55:14+5:30
महिलेने घटनेला आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मृतदेहाचं पोस्टमार्टम करून परिवाराकडे सोपवलं. तर महिलेला अटक केली.

पतीची हत्या केली मग मृतदेहाजवळ रात्रभर बसली, 4 वर्षाआझी केलं होतं लव्ह मॅरेज
राजस्थानच्या चुरूमधून हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका महिलेने लव्ह मॅरेजच्या 4 वर्षांनंतर पतीची हत्या केली. तिने दोराने पतीला गळा आवळला. त्यानंतर रात्रभर त्याच्या मृतदेहासोबत बसून राहिली आणि पतीला बघत राहिली. यानंतर महिलेने घटनेला आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मृतदेहाचं पोस्टमार्टम करून परिवाराकडे सोपवलं. तर महिलेला अटक केली.
पोलिसांनुसार, ही घटना चूर शहराच्या ओम कॉलनीमधील आहे. इथे भाड्याच्या घरात राहत असलेल्या दीपिकाने तिचा 26 वर्षीय पती मोहनलालची हत्या केली. यानंतर रात्रभर ती पतीच्या मृतदेहासोबत बसून राहिली.
सकाळी महिलेने पोलिसांना सूचना देऊन सांगितलं की, तिच्या पतीने आत्महत्या केली. पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले आणि तेथील स्थिती पाहिली तर त्यांना संशय आला. त्यानंतर चौकशी केल्यावर हत्या झाल्याचं समोर आलं.
पोलिसांनी सांगितलं की, बर गावातील निवासी दलबीरने याबाबत तक्रार दाखल केली. दलबीर मृत तरूणाचा पिता आहे. तक्रारीत दलबीर म्हणाला की, 2019 मध्ये मुलगा मोहनलालने दीपिकासोबत लव्ह मॅरेज केलं होतं. सुरूवातीला दोघेही आधी गावात राहत होते.
यानंतर गेल्या 8 महिन्यांपासून मोहनलाल आणि त्याची पत्नी दीपिका चुरूमध्ये एका भाड्याच्या घरात राहत होते. दोघांमध्ये वाद होत राहत होते. दीपिकाला मोहनलालपासून दूर व्हायचं होतं. तिने अनेकदा घटस्फोटाची मागणी केली आणि जर घटस्फोट दिला नाही तर काहीही करेल असंही ती म्हणाली होती. तिने मोहनलालच्या वडिलाला सांगितलं की, त्याचा मृत्यू झाला आहे.