पत्नीला सोडून मित्र आणि प्राण्यांसोबत संबंध ठेवत होता पती, Whatsapp चॅट बघून पत्नीला बसला धक्का...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 13:05 IST2023-02-11T13:04:35+5:302023-02-11T13:05:20+5:30

Crime News : सोबतच तक्रारीत लिहिलं की, तिचा पती प्राण्यांसोबतही शारीरिक संबंध ठेवतो. यासोबतच महिलेने पतीवर हुंड्यासाठी मारहाण केल्याचाही आरोप केला आहे. ज्याची पोलीस चौकशी करत आहेत. 

Husband made physical relation with animals and friend whatsapp chat leak the matter to wife fir lodged | पत्नीला सोडून मित्र आणि प्राण्यांसोबत संबंध ठेवत होता पती, Whatsapp चॅट बघून पत्नीला बसला धक्का...

पत्नीला सोडून मित्र आणि प्राण्यांसोबत संबंध ठेवत होता पती, Whatsapp चॅट बघून पत्नीला बसला धक्का...

Crime News : झारखंडच्या रांचीमधून एक अजब घटना समोर आली आहे. इथे एका महिलेने पतीविरोधात अजब तक्रार दाखल केली आहे. महिलेने तिच्या पतीवर समलैंगिक असण्याचा आरोप केलाय. सोबतच तक्रारीत लिहिलं की, तिचा पती प्राण्यांसोबतही शारीरिक संबंध ठेवतो. यासोबतच महिलेने पतीवर हुंड्यासाठी मारहाण केल्याचाही आरोप केला आहे. ज्याची पोलीस चौकशी करत आहेत. 

रांचीमध्ये राहणाऱ्या महिलेने तक्रारीत लिहिलं की, तिला खोटं सांगत तिच्या पतीने तिच्यासोबत लग्न केलं. महिलेनुसार, तिचं लग्न 2021 च्या फेब्रुवारीमध्ये महिन्यात झालं होतं. पण लग्नाच्या एक महिन्यानंतर पतीकडून हुंड्याची मागणी करण्यात आली. त्यावरून त्यांच्यात भांडण होत होतं. पती तिला मारहाण करत होता. तरीही ती पतीला सोडण्यास तयार नव्हती.

यादरम्यान महिलेने असे काही फोटो आणि व्हिडीओ पाहिले जे बघून तिला चांगलाच धक्का बसला. तसेच तिने पतीचे व्हॉट्सअॅप चॅट बघितले ज्यावरून तिला तिच्या पतीच्या समलैंगिक संबंधाबाबत समजलं. अशातच पत्नीला समजलं की, पती प्राण्यांसोबतही संबंध ठेवतो. 

जेव्हा महिलेने पतीला याबाबत विचारलं तेव्हा त्याने तिला मारहाण केली आणि म्हणाला की, ती त्याचं काहीच बिघडवू शकत नाही. ज्यानंतर महिला न्यायासाठी पोलिसांकडे गेली. तिने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली.

Web Title: Husband made physical relation with animals and friend whatsapp chat leak the matter to wife fir lodged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.