शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
6
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
7
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
8
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
9
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
10
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
11
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
12
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
13
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
14
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
15
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
16
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
17
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
18
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
19
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
20
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पतीच्या मदतीसाठी पत्नीचा आक्रोश, बघे बनवत राहिले व्हिडीओ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 13:57 IST

गोळीबार झाल्यावर पीडितांच्या मदतीला येण्याऐवजी तिथे उपस्थित असलेल्या बघ्यांनी घटनेचा व्हिडीओ बनवले. 

पाटणा - एखादी दुर्घटना घडल्यावर संकटात सापडलेल्यांच्या मदतीला जाण्यापेक्षा त्यांचे फोटो, व्हिडीओ काढण्याची सवय अनेकांना झाली आहे. असाच एक लाजिरवाणा आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. बिहारमधील सीवान स्टेशनवर एका सपत्निक प्रवास करत असलेल्या एका प्रवाशावर दिवसाढवळ्या त्याच्या पत्नीसमोर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पतीला जवळ घेत पत्नी मदतीसाठी विनवणी करत राहिली, मात्र कुणीही तिची मदत करण्यासाठी पुढे आले नाही. अखेरीस त्या व्यक्तीने पत्नीच्या मांडीवरच वेदनेने विव्हळत प्राण सोडले. संतापजनक बाब म्हणजे हा प्रकार घडला असताना पीडितांच्या मदतीला येण्याऐवजी तिथे उपस्थित असलेल्या बघ्यांनी घटनेचा व्हिडीओ बनवले. मिळालेल्या माहितीनुसार मृत व्यक्ती कोलकाता येथील व्यापारी असल्याचे समोर आले आहे. रविवारी दुपारी मोहम्मद फैझल हे आपली नवविवाहित पत्नी अंजुम खातून हिच्यासह सिवास रेल्वे स्टेशनवर कोलकाता येथे जाणाऱ्या बाघ एक्सप्रेसची वाट पाहत होते. त्याच दरम्यान, एका अज्ञात व्यक्तीने फैझल यांच्यावर मागून गोळीबार केला. त्यानंतर त्यांची पत्नी मदतीसाठी विनवण्या करत राहिली. मात्र तिथे उपस्थित असलेले लोक केवळ व्हिडिओ काढत राहिले. काही वेळाने एक पोलीस तिथे आला. मात्र तो केवळ चौकशी करून निघून गेला. तेवढ्यात फैजल यांनी प्राण सोडले.  फैजल यांचा सहा महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. ते आपल्या पत्नीला नेण्यासाठी कोलकात्याहून सीवान येथे आले होते. दरम्यान,  हत्येचे नेमके कारण समोर आलेले नाही. तसेच ज्या ठिकाणी हा गोळीबार झाला. त्या प्लॅटफॉर्मवर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याची बाब उघड झाली आहे.   

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहारMurderखून