घरगुती वादातून पतीने केली पत्नीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 18:06 IST2020-09-20T18:04:47+5:302020-09-20T18:06:49+5:30

शनिवारच्या रात्रीदरम्यान धारधार शस्त्राने वार करून पत्नीची हत्या केली.

Husband kills wife over domestic dispute | घरगुती वादातून पतीने केली पत्नीची हत्या

घरगुती वादातून पतीने केली पत्नीची हत्या

ठळक मुद्देहत्या केल्यानंतर मृतदेह शेतात टाकून दिला.हा प्रकार रविवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आला. आरोपी फरार असून, त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव (वाशिम) : घरगुती वादातून पतीने धारदार शस्त्राने पत्नीची हत्या केल्याची घटना मालेगाव तालुक्यातील कोळगाव येथे १९ सप्टेंबर रोजी रात्रीदरम्यान घडली. सागर किसन मुळे (४५) असे मृतकाचे नाव असून, किसन कुंडलिक मुळे (५०) असे आरोपीचे नाव आहे.
कोळगाव येथील सागर मुळे आणि किसन मुळे यांच्यात घरगुती कारणावरून वाद होते. या वादातून किसनने शनिवारच्या रात्रीदरम्यान धारधार शस्त्राने वार करून पत्नीची हत्या केली. हत्या केल्यानंतर मृतदेह शेतात टाकून दिला. हा प्रकार रविवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच वाशिमचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. पवन बनसोड, मालेगावचे ठाणेदार आधारसिंग सोनोने यांच्यासह पोलीस चमूने घटनास्थळ गाठले. मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करण्यात आला. दरम्यान, आरोपी फरार असून, त्याचा शोध पोलीस घेत आहेत. याप्रकरणी मधुकर कुंडलिक मुळे यांच्या फिर्यादीवरून किसन मुळे याच्यावर भादंवी कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास तानाजी गव्हाणे करीत आहेत.

Web Title: Husband kills wife over domestic dispute