डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 11:42 IST2025-11-10T11:41:15+5:302025-11-10T11:42:02+5:30
पती पत्नी यांच्यात विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून कायम भांडण होत असे. रविवारी दुपारी याच विषयावरून दोघांमध्ये वाद झाला.

डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
हैदराबाद - शहरातील अमीनपूर येथील KSR नगरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी रिअल इस्टेट व्यावसायिक ब्रह्माय्या याने त्याची पत्नी कृष्णावेणीची हत्या केली आहे. विवाहबाह्य संबंधातून ही हत्या झाल्याचं बोलले जाते. चारित्र्याच्या संशयावरून पती आणि पत्नी यांच्यात सातत्याने वाद व्हायचे. रविवारी दुपारी या दोघांमध्ये भांडण झाले. हा वाद इतका विकोपाला गेला की पतीने पत्नीची हत्या केली.
भांडणामुळे रागाच्या भरात पती ब्रह्माय्याने कथितपणे कृष्णावेणीच्या डोक्यात क्रिकेटच्या बॅटने हल्ला केला. ज्यात तिचा जागीच मृत्यू झाला. कृष्णावेणी कोहिर ही DCCB बँकेत असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करत होती. मयत कृष्णावेणीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ब्रह्माय्या आणि त्याची पत्नी कृष्णावेणी हे त्यांच्या २ मुलांसह केएसआर नगरमध्ये राहायला होते. त्यांची एक मुलगी बारावीला तर मुलगा ८ वी शिकत आहे. ब्रह्माय्या एक रिअल इस्टेट व्यावसायिक होते. कृष्णावेणी बँकेत जॉब करत होत्या. हे कुटुंब कायम हसत खेळत सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहत होते.
माहितीनुसार, पती पत्नी यांच्यात विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून कायम भांडण होत असे. रविवारी दुपारी याच विषयावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादाने टोकाचे रुप धारण केले. त्यात हिंसा झाली. रागाच्या भरात आरोपी पतीने पत्नीच्या डोक्यात क्रिकेटच्या बॅटने वार केले. त्यात पत्नी कृष्णावेणीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृत कृष्णावेणीच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून सध्या तपास सुरू आहे. आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे.
संशयावरून पती-पत्नीमध्ये भांडण
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर आरोपीला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि प्रकरणाचा तपास सुरू आहे. पती-पत्नीमधील भांडण संशयावरून झाले आणि त्याचे रूपांतर शारीरिक हाणामारीत झाले असं अमीनपूरचे पोलीस निरीक्षक नरेश यांनी सांगितले.