husband killed wife in haryana's ambala | विवाहबाह्य संबंधात अडसर ठरणाऱ्या पत्नीचा पतीने काढला काटा, असा उलगडला खुनाचा कट 

विवाहबाह्य संबंधात अडसर ठरणाऱ्या पत्नीचा पतीने काढला काटा, असा उलगडला खुनाचा कट 

ठळक मुद्दे सर्वात धाकटी बहीण सीमाचे जगदीशसोबत सन २००२ मध्ये लग्न झाले होते. त्यांची दोन मुले 17 वर्षांची महेक आणि 14 वर्षाची मोनू आहेत. सीमाचा मृत्यू हार्टअटॅकमुळे झाला नसल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला आहे, तर जगदीशने तिचा गळा दाबला आहे, असा आरोप केला आहे. 

विवाहबाह्य संबंधात अडसर ठरल्यानांतर पतीने पत्नी सीमाचा गळा दाबून हत्या केली. मारेकरी पती जगदीश हा उत्तर रेल्वे, अंबाला कॅन्टोन्मेंटमध्ये तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहे. सोमवारी सायंकाळी या घटनेनंतर तो मृतदेह ताब्यात घेऊन आपल्या मूळ गावी हिसारमधील बरवालाच्या हैदरवाला गावी पोचला. टोहाना येथे राहणाऱ्या मृत महिलेच्या माहेरील मंडळीला संशय आला. म्हणूनच ते तेथे पोहोचला आणि त्यांनी हत्येचा संशय व्यक्त केला. यामुळे मृतदेह पुन्हा अंबाला येथे आणण्यात आला. अंबाला येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनानंतर सेक्टर -9 पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टोहाना येथे राहणारे सुरेंद्र सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार तीन भावंडे आहेत. सर्वात धाकटी बहीण सीमाचे जगदीशसोबत सन २००२ मध्ये लग्न झाले होते. त्यांची दोन मुले 17 वर्षांची महेक आणि 14 वर्षाची मोनू आहेत. काही दिवसांपूर्वी संपूर्ण कुटुंब भावाच्या लग्नात आले होते. सीमा आणि जगदीशसुद्धा आले होते. जगदीशचे एका महिलेबरोबर विवाहबाह्य संबंध होते, अशी माहिती सीमा यांनी कुटुंबीयांना दिली. यामुळे घरात भांडणं सुरु होती.


कुटुंबीयांच्या सांगण्यावरून जगदीशने माफी मागितली. पुन्हा तसे न करण्याचे आश्वासन दिले होते. सोमवारी मोठ्या भावाचा फोन आला की सीमा मरण पावली आहे. जगदीशने हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला अशी बतावणी केली. जगदीश म्हणाला की तो एकटा पडला आहे. म्हणून गावी मृतदेह घेऊन येत आहे. हे संशयाचे कारण होते. कुटुंबातील सदस्यांनी संशय व्यक्त केला आणि अंत्यविधी थांबविला. घटनास्थळ अंबालाचे असल्याने मृतदेह तेथे परत आणण्यात आला. सीमाचा मृत्यू हार्टअटॅकमुळे झाला नसल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला आहे, तर जगदीशने तिचा गळा दाबला आहे, असा आरोप केला आहे. 
 

 

सदर महिलेचा गळा दाबल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. गुन्हा दाखल करण्यात आला आहे.- हमीर सिंग, पोलीस निरीक्षक, सेक्टर 9 पोलीस ठाणे 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

अर्णब गोस्वामीविरुद्ध पोलिसांकडे तक्रार, अटक करण्याची मागणी

 

रक्षाबंधनसाठी माहेरी आलेली महिला, प्रियकराने गोळ्या घालून केली हत्या

 

संगमनेरात बजरंग दलाचे पदाधिकारी ताब्यात

 

...चांगला मेसेज गेला नाही; बिहार पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाईन केल्याबद्दल SC ने कान खेचले!

 

Disha Salian Case: नारायण राणेंच्या गंभीर आरोपानंतर पोलिसांचं पुराव्यांसाठी आवाहन

Web Title: husband killed wife in haryana's ambala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.