चारित्र्यावर संशय घेत पतीने केली पत्नीची गळा कापून केली हत्या  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 20:15 IST2019-09-09T20:04:14+5:302019-09-09T20:15:13+5:30

हत्येनंतर स्वतः पतीने पोलीस ठाण्यात जाऊन केले प्रत्यार्पण

Husband killed wife due to taking extra marital affair | चारित्र्यावर संशय घेत पतीने केली पत्नीची गळा कापून केली हत्या  

चारित्र्यावर संशय घेत पतीने केली पत्नीची गळा कापून केली हत्या  

ठळक मुद्देपोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी पतीला अटक केली आहे. आरोपी पतीने हत्येनंतर स्वतः विरार पोलीस ठाण्यात जाऊन प्रत्यार्पणही केले.

नालासोपारा - विरार पूर्वेकडील परिसरात रविवारी दुपारी एका पतीने पत्नीचा चारित्र्यावर संशय घेऊन कोयत्याने गळा कापून हत्या केल्याची धक्कादायक आणि खळबळजनक माजवणारी घटना घडली आहे. आरोपी पतीने हत्येनंतर स्वतः विरार पोलीस ठाण्यात जाऊन प्रत्यार्पणही केले. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी पतीला अटक केली आहे. या हत्येनंतर संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे.

विरार पूर्व भोईरपाडा परिसरातील बाळकृष्ण सोसायटीमध्ये किशोर फुटाणे (62) पत्नी सुलभा (45) आणि मुलासोबत राहत होते. किशोर हे विरार परिसरात रिक्षा चालवायचे. ते त्याच्या पत्नीवर नेहमी चरित्र्यावरून संशय घ्यायचे. याच कारणामुळे दोघांमध्ये नेहमी भांडणे व्हायची. रविवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पत्नी घरात एकटी असताना कोणत्या तरी कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. याच रागाच्या भरात किशोरने कोयत्याच्या साहयाने गळा कापून तिची हत्या करत नंतर स्वतः विरार पोलीस ठाण्यात जाऊन सर्व हकीकत सांगून प्रत्यार्पण केले.पोलीस सूत्रांकडून अशी माहिती मिळते की, मृत महिलेचे एका पुरुषासोबत प्रेमप्रकरण सुरू होते व पती रिक्षा चालवण्यासाठी गेल्यावर तो पुरुष घरी यायचा. रविवारी किशोर अचानक दुपारी घरी आल्यानंतर तो पुरुष घरी असल्याने दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाल्यावर रागाच्या भरात पत्नीची हत्या केल्याचे समजते. 

Web Title: Husband killed wife due to taking extra marital affair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.