दीरासोबत हसून-हसून बोलत होती वहिनी, पतीच्या डोळ्यात खुपलं आणि उचललं धक्कादायक पाउल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 11:39 IST2023-03-02T11:39:16+5:302023-03-02T11:39:28+5:30

MP Crime News : मीडिया रिपोर्टनुसार, पोलिसांना सूचना मिळाली की, जामली गावात सीताराम भिलालाच्या घरात त्याची 22 वर्षीय पत्नी रेखा बाईचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला आहे.

Husband killed wife because she talks with brother in law friendly | दीरासोबत हसून-हसून बोलत होती वहिनी, पतीच्या डोळ्यात खुपलं आणि उचललं धक्कादायक पाउल

दीरासोबत हसून-हसून बोलत होती वहिनी, पतीच्या डोळ्यात खुपलं आणि उचललं धक्कादायक पाउल

MP Crime News : मध्य प्रदेशच्या सीहोर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका पतीने कुऱ्हाडीने पत्नीची हत्या केली. केवळ 22 वर्षीय पत्नीचा गुन्हा इतकाच होता की, ती दीरासोबत हसून बोलत होती. हेच पतीला पटत नव्हतं. त्याने अनेकदा पत्नीला भावापासून वेगळं राहण्याचा सल्ला दिला. पण तिनेही ऐकलं नाही. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, पोलिसांना सूचना मिळाली की, जामली गावात सीताराम भिलालाच्या घरात त्याची 22 वर्षीय पत्नी रेखा बाईचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोलिसांनी चौकशी केली तेव्हा त्यांचा संशय महिलेच्या पतीवर गेला.

चौकशी केल्यावर आरोपीने पोलिसांना आधी चुकीची माहिती दिली. पण नंतर त्याने सगळं सत्य सांगितलं. त्याने पोलिसांना सांगितलं की, पत्नी रेखा लहान भाऊ म्हणजे दीरासोबत हसून-हसून बोलत होती. हे त्याला आवडत नव्हतं. त्याला वाटत होतं त्यांच्यांत काही सुरू आहे. आरोपीने महिलेला अनेकदा समजावलं. पण तिने ऐकलं नाही. यावरून नाराज होऊन त्याने पत्नीची हत्या केली.

पोलिसांनी सांगितलं की, सीतारामने चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीची हत्या केली. 1 मार्चच्या रात्री जेव्हा तो कामाहून घरी आला तेव्हा त्याचा पत्नीसोबत वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात त्याने पत्नीवर कुऱ्हाडीने वार केले. महिलेचा जागीच मृत्यू झाला. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

Web Title: Husband killed wife because she talks with brother in law friendly