'महिलेने केली होती ५ लग्ने, अफेअरमुळे पाचव्या पतीने केली हत्या', पोलिसांनी केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 06:06 PM2022-01-14T18:06:21+5:302022-01-14T18:23:47+5:30

Indore Double Murder Case Solved : हत्येची सूचना घर मालकाने पोलिसांना दिली होती. चौकशीनंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केले आणि त्याला महाराष्ट्रातील अकोल्यातून अटक करण्यात आली.

Husband killed wife and son illicit relation police arrested in Indore | 'महिलेने केली होती ५ लग्ने, अफेअरमुळे पाचव्या पतीने केली हत्या', पोलिसांनी केला खुलासा

'महिलेने केली होती ५ लग्ने, अफेअरमुळे पाचव्या पतीने केली हत्या', पोलिसांनी केला खुलासा

Next

मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) इंदुरमधील (Indore) एका दुहेरी हत्याकाडांचं (Double Murder) रहस्य पोलिसांनी उलगडत आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितलं की, आरोपीने अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नी आणि मुलाची हत्या केली होती. हत्या करून तो फरार झाला होता. हत्येची सूचना घर मालकाने पोलिसांना दिली होती. चौकशीनंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केले आणि त्याला महाराष्ट्रातील अकोल्यातून अटक करण्यात आली.

पोलिसांनी सांगितलं की, आरोपी आपल्या पत्नीवर संशय घेत होता. ज्यामुळे दोघांमध्ये नेहमीच भांडण होत होतं. मृत महिलेचं हे पाचवं लग्न होतं. आरोप आहे की, तरीही महिलेचं कुणासोबत तरी अफेअर सुरू होतं. यामुळे नाराज पतीने पत्नी आणि ११ वर्षाच्या मुलाची हत्या केली.

आरोपीने पोलिसांना सांगितलं की, जेव्हा त्याची पत्नी आणि मुलगा झोपलेले होते. तेव्हा त्याने दोघांवर सिलेंडर फेकलं आणि नंतर धारदार शस्त्राने दोघांचा गळा कापला. आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर तो तेथून फरार झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलीस आयुक्त धमेंद्र सिंह भदौरिया यांनी हत्येचा खुलासा कर सांगितलं की, मंगेश जो आरोपी कमलेशचा मित्र आहे. त्याच्या जबाबाच्या आधारावर कमलेशचा शोध घेतला गेला आणि त्याला इंदुरहून ४०० किलोमीटर दूर अकोल्यातून अटक केली गेली. आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे.
 

Web Title: Husband killed wife and son illicit relation police arrested in Indore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.