खळबळजनक! लग्नानंतर पती झाला हैवान, पत्नीची केली हत्या; ६ महिन्यांपूर्वीच केलेलं लव्हमॅरेज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 11:58 AM2024-06-20T11:58:57+5:302024-06-20T12:04:48+5:30

दोन दिवसांपूर्वी रस्त्याच्या कडेला एका महिलेचा मृतहेद सापडला होता. त्याबाबत पोलिसांनी आता मोठा खुलासा केला आहे.

husband killed wife after 6 months of love marriage dead body thrown on road | खळबळजनक! लग्नानंतर पती झाला हैवान, पत्नीची केली हत्या; ६ महिन्यांपूर्वीच केलेलं लव्हमॅरेज

फोटो - hindi.news18

राजस्थानच्या सीकरमध्ये एक भयंकर घटना घ़डली आहे. दोन दिवसांपूर्वी रस्त्याच्या कडेला एका महिलेचा मृतहेद सापडला होता. त्याबाबत पोलिसांनी आता मोठा खुलासा केला आहे. महिलेच्या पतीनेच तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह फेकला होता. धक्कादायक बाब म्हणचे अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच या दोघांनी लव्हमॅरेज केलं होतं. मात्र लग्नानंतर दोघांमध्ये वाद होत असल्याने पतीने तिचा काटा काढला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिखा अग्रवाल हिचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. ४ डिसेंबर २०२३ रोजी तिचं पंकज बत्रासोबत लव्हमॅरेज झालं होतं. शिखा आणि पंकज हे दोघेही बँकेत काम करायचे ते एका भाड्याच्या घरात राहत होते. पण लग्नानंतर एका महिन्यात दोघांमध्ये खूप वाद होऊ लागले. त्यामुळे शिखा आपल्या माहेरी निघून गेली. आपल्या वडिलांच्या घरी ती राहू लागली. 

पोलिसांनी केलेल्या तपासात असं आढळून आलं की, १६ जून रोजी संध्याकाळी सात वाजता पंकजने फोन करून शिखाला नेहरू पार्क ग्राऊंडमध्ये भेटायला बोलावलं. त्यानंतर शिखा घरी परत आलीच नाही. कुटुंबीयांनी दोघांचा शोध घेण्यास सुरुवात केली. शिखाच्या वडिलांनी याबाबत पोलिसांत माहिती दिली. पोलिसांनी दोघांच्या मोबाईलचं लोकेशन ट्रेस केलं तेव्हा पंकजचा फोन स्वीच ऑफ आला. तर शिखाचा फोनचं लोकेशन खादरा जवळ दाखवलं. 

पंकजने शिखाला भेटायला बोलावलं होतं. तेव्हा फिरण्याच्या बहाण्याने तो तिला आपल्या गाडीतून घेऊन गेला. त्यानंतर ते दोघेही रस्त्याच्या कडेला एका निर्जनस्थळी बोलत होते. तेव्हात आपल्या कारमध्ये पंकजने शिखाची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर कारमधून मृतदेह बाहेर काढून तो रस्त्याच्या कडेला फेकला. यानंतर पंकज फरार झाला होता. पण त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. 

पंकजची पोलिसांनी कसून चौकशी केली असतान त्याने आपणच शिखाची हत्या केल्याचं कबूल केलं आहे. पोलिसांपासून वाचता यावं म्हणूनच त्याने पत्नीचा फोन एका दुसऱ्या ठिकाणी फेकून दिला. सततची भांडणं आणि नात्यातील दुरावा यामुळेच तिची हत्या केल्याचं म्हटलं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 
 

Web Title: husband killed wife after 6 months of love marriage dead body thrown on road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.