घर सोडून गेलेली पत्नी पुतणीच्या लग्नात दिसली तर पतीने केली हत्या, पोलिसांसमोर जाऊन रडू लागला....

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 17:37 IST2021-08-06T17:34:46+5:302021-08-06T17:37:05+5:30

कानपूरमधील  रास्तरपूर गावातील ही घटना आहे. इथे राहणारा रफीक दारोड्या होता. दारूच्या सवयीमुळे त्याचं सतत पत्नीसोबत भांडण होतं होतं.

UP : Husband killed his wife then reached police station in Kanpur | घर सोडून गेलेली पत्नी पुतणीच्या लग्नात दिसली तर पतीने केली हत्या, पोलिसांसमोर जाऊन रडू लागला....

घर सोडून गेलेली पत्नी पुतणीच्या लग्नात दिसली तर पतीने केली हत्या, पोलिसांसमोर जाऊन रडू लागला....

उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये एका व्यक्तीने त्याच्या पत्नीची हत्या केली आणि नंतर स्वत:च पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याने सरेंडर केलं. त्याने सांगितलं की, पत्नी घर सोडून निघून गेली होती. ज्यामुळे त्याची फार बदनामी झाली होती. तो लोकांच्या नजरेस नजर मिळवू शकत नव्हता. त्यामुळे पत्नीची हत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

कानपूरमधील  रास्तरपूर गावातील ही घटना आहे. इथे राहणारा रफीक दारोड्या होता. दारूच्या सवयीमुळे त्याचं सतत पत्नीसोबत भांडण होतं होतं. ज्यामुळे पत्नीला त्याला सोडून माहेरी गेली होती. काही दिवसांपूर्वीच दारूमुळे दोघांमध्ये भांडण झालं होतं. ज्यानंतर पत्नी गपचूप मोठ्या मुलाला घेऊन माहेरी घाटमपूरला निघून गेली होती.

पत्नी अशी अचानक घर सोडून गेल्याने रफीकला वाटलं की, पत्नी दुसऱ्या व्यक्तीसोबत पळून गेली. या संशयामुळे तो सतत टेंशनमध्ये राहत होता. काही दिवसांपूर्वी रफीकच्या पुतणीचं लग्न होतं. या लग्नात सहभागी होण्यासाठी रफीकची पत्नी मुलाला घेऊन रास्तपुर गावात आली होती. पत्नीला बघून रफीक पत्नीसोबत भांडू लागला.

त्यानंतर परिवारातील लोकांनी त्यांचं भांडण सोडवलं. पण मनात शंकेचं भूत घेऊन रफीकने पत्नीविरोधात खरतनाक प्लॅन केला. त्याने पत्नीला जसं एकटं पाहिलं, तेव्हा त्याने तिच्यावर हल्ला केला. एकापाठी वार पत्नीच्या डोक्यावर केले ज्यामुळे ती रक्तबंबाळ झाली होऊन जमिनीवर पडली.

घरातील लोक तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले, पण तोपर्यंत तिचा मृत्यू  झाला होता. दुसरीकडे पत्नीची हत्या करून रफीक पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. पोलिसांना त्याने रडत रडत सांगितलं की, तो पत्नीची हत्या करून आला आहे. कारण त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती. 
 

Web Title: UP : Husband killed his wife then reached police station in Kanpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.