शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांनी टाकला 'सिंचन बॉम्ब'; पार्टी फंडासाठी प्रकल्पाचा खर्च ११० कोटींनी कुणी वाढवला?
2
...म्हणून राज ठाकरेंनी माझ्यावर टीका करणं टाळलं असावं; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं का बोलले?
3
मुंबईत पकडलेल्या त्या दोन बांगलादेशींना मायदेशी पाठवलं, आता पुन्हा कफ परेडमध्ये सापडल्या...
4
गुंतवणूकदारांची दिवाळी! RBI च्या निर्णयामुळे गुंतवणूकदार मालामाल; ५ वर्षांत पैसा झाला ३ पट!
5
ही मराठी माणसांच्या नाही तर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई; एकनाथ शिंदेंचा घणाघात
6
मृत्यूची झडप! महाकाय क्रेन भरधाव 'रेल्वे गाडी'वर वर कोसळलं; २८ प्रवाशांचा मृत्यू, कसा घडला अपघात?
7
Syeda Falak: "एक दिवस ही हिजाब घातलेली मुस्लीम महिला…" फडणवीसांना चॅलेंज देणारी सईदा फलक आहे तरी कोण?
8
गुंतवणूकदारांची संक्रांत! निफ्टी ५०० मधील ७०% शेअर्स तोट्यात; ५ वर्षांतील सर्वात खराब सुरुवात
9
एकाच ठिकाणी व्हिडिओ एडिटिंग, प्रॉडक्शन अन् डिझाइनिंग; Apple ने लॉन्च केला Creator Studio
10
ठाकरे बंधूंनी आक्षेप घेतलेले PADU Machine नेमके कसे आणि काय काम करते? सविस्तर माहिती जाणून घ्या
11
'स्वयंपाक, मुले जन्माला घालणे, हेच उत्तर भारतीय महिलांचे काम', DMK खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य
12
Virat Kohli New Record : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत विराटच ‘धुरंधर’! सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला
13
वेदांताच्या शेअर्सचा विक्रमी उच्चांक: ४ दिवसांत १३% वाढ; 'नुवामा'कडून ८०६ रुपयांचं नवं टार्गेट
14
"मला काहून पाडलं? मह्या तोंडाला फेस येतो... माणूस पाहायचा नाही, फक्त...!'; दानवेंचं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
15
“‘टॉयलेट मॅनर्स’ आहेत, त्यांनीच स्लीपर वंदे भारत ट्रेनने प्रवास करावा”; रेल्वे अधिकाऱ्यांची पोस्ट चर्चेत
16
Nashik Municipal Election 2026 : निष्ठावंत, पाहुण्यांसह ७६ जणांवर भाजपमधून हकालपट्टीची संक्रांत; उद्धवसेनेतून ५ जणांची हकालपट्टी
17
अपहरण झालेल्या चिमुकलीच्या सुटकेसाठी राप्ती सागर एक्स्प्रेस नॉन-स्टॉप २६० किमी धावली!
18
PADU Machine: "मुंबईमध्ये 'पाडू' मशीन सरसकट वापरले जाणार नाही, तर..."; राज ठाकरेंच्या संतापानंतर आयुक्त गगराणींचा खुलासा
19
उणे ४०% गुण घेणाऱ्यांनाही मिळणार अ‍ॅडमिशन; NEET PG कट-ऑफ कमी करण्याच्या निर्णयाने वाद
20
बिटकॉइनचा धमाका! ९६ हजार डॉलर्सचा टप्पा ओलांडून २ महिन्यांच्या उच्चांकावर; पुढे काय होईल?
Daily Top 2Weekly Top 5

रात्री गूढरित्या गायब होणाऱ्या पत्नीमुळे पती त्रस्त; थेट पोलीस अधीक्षकांकडे घेतली धाव! म्हणाला, 'मला वाचवा, नाहीतर..'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 14:19 IST

मुढापांडे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरकडा गावात राहणाऱ्या या तरुणाचे लग्न गेल्या वर्षीच झाले आहे.

उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये एक अतिशय धक्कादायक आणि गंभीर प्रकरण समोर आले आहे. पत्नीच्या गूढ वागण्यामुळे त्रस्त झालेल्या पतीने थेट वरिष्ठ पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली आणि स्वतःच्या जीवाला धोका असल्याचे सांगत सुरक्षेची मागणी केली. पतीचा आरोप आहे की, त्याची पत्नी रात्रीच्या वेळी घरातून अचानक गायब होते आणि जेव्हा तो याबद्दल तिला विचारतो, तेव्हा ती त्याला जीवे मारण्याची धमकी देते.

'ती मला कधीही मारू शकते!'

मुढापांडे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरकडा गावात राहणाऱ्या या तरुणाचे लग्न गेल्या वर्षीच झाले आहे. त्याने एसएसपींना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, "साहब, मला वाचवा. माझी पत्नी मला धमकी देते आणि इतरांकडून धमक्याही देण्याचे काम करवून घेते. ती मला कधीही मारू शकते."

पतीचे गंभीर आरोप काय?

आपबिती सांगताना पती म्हणाला की, पत्नी रात्रीच्या वेळी कोणालाही न सांगता घरातून निघून जाते आणि पहाटे परत येते. पतीला तिच्यावर इतर एका युवकासोबत अवैध संबंध असल्याचा गंभीर संशय आहे. पतीने पत्नीला विरोध केल्यास ती पतीला जीवे मारण्याची धमकी देते. इतकेच नाही तर, पत्नी वारंवार 'विष खाऊन आत्महत्या करेन' किंवा 'विजेची तार पकडून जीव देईन' अशा धमक्या देते. 'मी आणि तुमच्या कुटुंबाला खोट्या केसमध्ये अडकवेन आणि तुरुंगात पाठवेन,' अशी धमकीही ती देते, असे पतीने सांगितले.

पत्नी सतत पतीवर माहेरच्या घरी जाण्यासाठी आणि भरपूर पैसे कमवून आणण्यासाठी जबरदस्ती करते. पत्नी एकटीच नाही तर, रामपूरच्या टांडा येथील रहिवासी असलेला मेहुणा देखील त्याला धमक्या देत असल्याचे पतीने सांगितले आहे.

पोलिसांनी दिले कारवाईचे आश्वासन!

या सगळ्या धमक्या आणि त्रासाला कंटाळून पतीने पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली आहे. विशेष म्हणजे, इतका त्रास होत असूनही, पतीने अजूनही पत्नीला आपल्यासोबत ठेवण्याची तयारी दर्शवली आहे, पण पत्नीच्या कृत्यांमध्ये फरक पडत नसल्याचे त्याने सांगितले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत एसएसपींनी त्वरित तपासाचे आदेश दिले आहेत आणि पीडित पतीला योग्य कारवाईचे आश्वासन दिले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Husband Seeks Police Help: Wife Mysteriously Disappears, Threatens Him.

Web Summary : Uttar Pradesh man seeks police protection, alleging his wife vanishes nightly and threatens him. He suspects infidelity and fears for his life due to constant threats and blackmail attempts by her and her brother.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश