चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 20:54 IST2018-10-10T20:53:50+5:302018-10-10T20:54:05+5:30

बुधवारी सकाळी त्यांचा मुलगा कामावर गेल्यानंतर पती पत्नीत याच मुद्द्यावरून जोरदार भांडण झाले. भांडण इतके विकोपाला गेले की बाबूराव याने पत्नीची गळा चिरून हत्या केली आणि नंतर विरार पोलीस ठाण्यात हजर झाला.

Husband has murdered wife | चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या

चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या

वसई -  पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने आपल्या पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना विरार येथे घडली आहे. भारती माटे असं हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. हत्या केल्यानंतर आरोपी स्वत: विरार पोलीस ठाण्यात हजर झाला. 

बाबूराव माटे (वय ६०) आणि त्याची पत्नी भारती माटे (वय ५१) विरार पुर्वेच्या मनवेल पाडा येथील कारगिल नगरमधील गणेश अपार्टमेंटमध्ये रहात होते. त्यांना दोन मुले आहेत. मात्र बाबूराव आणि त्याच्या पत्नीसोबत सतत भांडण होत होते. तो तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. बुधवारी सकाळी त्यांचा मुलगा कामावर गेल्यानंतर पती पत्नीत याच मुद्द्यावरून जोरदार भांडण झाले. भांडण इतके विकोपाला गेले की बाबूराव याने पत्नीची गळा चिरून हत्या केली आणि नंतर विरार पोलीस ठाण्यात हजर झाला.

Web Title: Husband has murdered wife