Husband has locked up wife to meet girlfriend | गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी नवऱ्याने चक्क घरात कोंडले पत्नीला  
गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी नवऱ्याने चक्क घरात कोंडले पत्नीला  

ठळक मुद्देतासाभराने तिला मदत मिळाली आणि तिची सुटका झाली.  नवऱ्याने चक्क आपल्या पत्नीला घरातच कोंडून ठेवल्याची घटना खळबळजनक घडली आहे. रविवारी गर्लफ्रेंडला भेटायला जाण्यासाठी त्याने तयारी केली.

अहमदाबाद - गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी अहमदाबादमधील रायपूर परिसरात नवऱ्याने चक्क आपल्या पत्नीला घरातच कोंडून ठेवल्याची घटना खळबळजनक घडली आहे. त्यानंतर ४० वर्षीय पत्नीने खादिया पोलीस ठाण्यात सोमवारी याबाबत घरगुती हिंसाचार केल्याची तक्रार दाखल केली. 

४० वर्षांच्या महिलेचा विवाह १६ वर्षांपूर्वी या पुरुषाशी झाला होता. गेल्या तीन वर्षांपासून त्याचे एका तरुणीशी विवाहबाह्य संबंध आहेत. रविवारी गर्लफ्रेंडला भेटायला जाण्यासाठी त्याने तयारी केली. ते पाहून पत्नीला संशय आला. तिने त्याला गर्लफ्रेंडकडे जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने तिला घरात कोंडून ठेवलं आणि बाहेरून कुलूप लावून निघून गेला. रायपूर येथे दुमजली घरात या पतीने पत्नीला कोंडून ठेवलं. एक तासभर पत्नी घरात कोंडलेल्या अवस्थेत होती. त्यानंतर खिडकीतून ये - जा करणाऱ्यांना आवाज देऊन एकास लॉक तोडण्यास सांगितले.पीडित पत्नीने मदतीसाठी आरडाओरडा केला. मात्र, तासाभराने तिला मदत मिळाली आणि तिची सुटका झाली. 

Web Title: Husband has locked up wife to meet girlfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.