आधी Love Marriage, मग पतीनं लिहून घेतली सुसाइड नोट, नंतर फासावर लटकवलं अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 12:06 PM2021-12-10T12:06:04+5:302021-12-10T12:10:03+5:30

या दोघांचे काही काळ सर्व काही सुरळीत सुरू होते, मात्र नंतर पीडितेच्या पतीने कुटुंबासह तिचा छळ सुरू केला. एवढेच नाही, तर मुलीला जातीवाचक शिवीगाळही केली जाऊ लागली होती. हे सातत्याने सुरू होते आणि तीही हे सर्व सहन करत राहिली, असा आरोप आहे.

Husband hang wife after love marriage in panipat nodark | आधी Love Marriage, मग पतीनं लिहून घेतली सुसाइड नोट, नंतर फासावर लटकवलं अन् मग...

आधी Love Marriage, मग पतीनं लिहून घेतली सुसाइड नोट, नंतर फासावर लटकवलं अन् मग...

googlenewsNext

पानिपत - हरियाणातील पानिपत येथून पती-पत्नीच्या नात्याला कलंक लावणारी घटना समोर आली आहे. ही घटना वाचून तुमच्याही अंगावर शहारा आल्याशिवाय राहणार नाही. पानिपतच्या न्यू हाऊसिंग बोर्ड कॉलनीत राहणाऱ्या एका तरुणीने शहरातील विकास नगरमध्ये राहणाऱ्या नीरजसोबत प्रेमविवाह केला होता. हे तिचे दुसरे लग्न होते. मात्र, नीरजच्या कुटुंबीयांना हा आंतरजातीय विवाह मान्य नव्हता. यामुळे दोघेही पती-पत्नी वेगळे राहू लागले होते.

या दोघांचे काही काळ सर्व काही सुरळीत सुरू होते, मात्र नंतर पीडितेच्या पतीने कुटुंबासह तिचा छळ सुरू केला. एवढेच नाही, तर मुलीला जातीवाचक शिवीगाळही केली जाऊ लागली होती. हे सातत्याने सुरू होते आणि तीही हे सर्व सहन करत राहिली, असा आरोप आहे.

मग एक दिवस… -
पीडितेच्या म्हणण्यानुसार, एके दिवशी तिच्या पतीने तिला पाण्यात नशेचा पदार्थ विरघळून पाजला आणि नंतर जबरदस्तीने सुसाईड नोट लिहायला लावली. पीडितेने सांगितले की, यानंतर पतीने तिला फासावर लटकवले आणि फरार झाला. यानंतर, जेव्हा तिच्या मुलीने हे पाहिले तेव्हा तिने तिच्या मामाला आणि आजीला याची माहिती दिली. यानंतर तिला फासावरून खाली उतरवून उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात तब्बल 15 दिवस ती जीवन-मरणाची लढाई लढत होती. तीचा जीव वाचला असला तरी, ती सध्या अंथरुनालाच खिळून आहे.

काय म्हणाले पोलीस -
याप्रकरणी चांदनीबाग पोलीस ठाण्याचे प्रभारी मनजीत सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या तक्रारीवरून भादंवि कलम 307 आणि 328 नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे. 

काय म्हणाले डॉक्टर -
ममतावर उपचार करत असलेले डॉ. गौरव श्रीवास्तव यांनी सांगितले की, जेव्हा तिला रुग्णालयात आणले गेले तेव्हा त्यांची प्रकृती गंभीर होती आणि तिला श्वास घेण्यासही त्रास होत होता. मात्र, आता प्रकृतीत बर्‍याच प्रमाणावर सुधारणा झाली आहे. मात्र, तिला उठण्यासाठी आणि चालण्यासाठी अद्यापही त्रास होत आहे.

आता पीडिता तिच्या माहेरी आहे. तसेच, तिने न्याय मिळावा आणि दोषींविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

Web Title: Husband hang wife after love marriage in panipat nodark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.