पतीचा पगार कमी असल्याने पैशांसाठी भांडत होती पत्नी; एक दिवस दोघेही दारू प्यायले आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 18:58 IST2022-03-02T18:52:31+5:302022-03-02T18:58:39+5:30
Rajasthan Crime News : पती-पत्नीचा ओरडण्याचा आवाज ऐकून कुटुंबिय मुलाच्या रूममध्ये धावले. कुटुंबिय म्हणाले की, आम्ही जसे वर पोहोचलो मुलगा जमिनीवर पडला होता आणि सून त्याच्या मतदेहाजवळ उभी होती.

पतीचा पगार कमी असल्याने पैशांसाठी भांडत होती पत्नी; एक दिवस दोघेही दारू प्यायले आणि मग...
राजस्थानच्या (Rajasthan Crime News) बाडमेरमध्ये एका पत्नीने निर्दयीपणे तिच्या पतीची हत्या केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पतीचा पगार कमी होता. त्यामुळे पत्नी नेहमीच पैशांवरून त्याच्यासोबत भांडत होती. असं सांगितलं जात आहे की, मंगळवारी रात्री उशीरा दोघांमध्ये पैशांवरून वाद झाला. यादरम्यान पत्नीच्या हाती एक बेल्ट लागला. या बेल्टनेच तिने पतीचा गळा आवळून त्याची हत्या केली. पती-पत्नीचा ओरडण्याचा आवाज ऐकून कुटुंबिय मुलाच्या रूममध्ये धावले. कुटुंबिय म्हणाले की, आम्ही जसे वर पोहोचलो मुलगा जमिनीवर पडला होता आणि सून त्याच्या मतदेहाजवळ उभी होती.
पत्नी ही यावेळी नशेत होती. तिने बेल्टच्या मदतीने पतीचा गळा आवळून त्याची हत्या केली. तरूणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृतकाच्या आईने याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी पत्नीला ताब्यात घेतलं आहे. चौकशी दरम्यान तिने तिचा गुन्हा कबूल केला आहे. आता पोलीस हत्येच्या कारणांची चौकशी करत आहेत.
पोलीस अधिकारी उगमराज सोनी म्हणाले की, शहरात राहणाऱ्या तरूणाच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली. तिने तिच्या रिपोर्टमध्ये सांगितलं की, तिचा मुलगा अनिल कुमार याची त्याची पत्नी मंजूने मंगळवारी रात्री गळा आवळून हत्या केली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि हॉस्पिटमध्ये पाठवला.
पोलिसांनी सांगितलं की प्राथमिक चौकशीतून समोर आलं की, पतीला कमी पगार होता. ज्यामुळे पती-पत्नीत नेहमीच भांडणं होत होती. घटनेच्या दिवशी पती-पत्नी दोघेही दारू पिऊन होते. यादरम्यान दोघात भांडण झालं. मग पत्नीने रागाच्या भरात पतीची हत्या केली. मृतकाच्या आईने तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी पत्नी मंजूची चौकशी केली. चौकशी दरम्यान मंजूने हत्या केल्याची बाब स्वीकारली. तिला ताब्यात घेतलं गेलं असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत.